स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी! फुटबॉल खेळण्यासाठी आईचा आधार

124

भारतीय संस्कृतीत आई या शब्दाला प्रचंड महत्व प्राप्त झालेलं आहे. ईश्वराला अवतार घेण्यासाठी देखील आईची आवश्यकता असते. अगदी प्राणी व पक्षांमध्येही आईच त्यांच्या पिल्लांचा सांभाळ करते. या गोष्टीची आठवण होण्याचं कारण म्हणजे सोशल मीडियावर एक सुंदर व्हिडिओ व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये आईच्या प्रेमाचं मोल दिसून येत आहे.

या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की मैदानात इतर मुलं खेळत आहेत आणि त्यांना त्रयस्तपणे पाहत कुबड्यांचा आधार घेऊन एक मुलगा उभा आहे. तो त्यांच्याप्रमाणे सराईतपणे खेळू शकत नाही हे त्याचं दुःख आहे. त्यालाही फुटबॉल खेळायचं आहे.

मग त्याच्या मदतीला त्याची माऊली येते. त्याला आधार देऊन ती त्याला फुटबॉल खेळण्यास प्रोत्साहन देते. तिच्या सहाय्याने तो मुलगा फुटबॉल खेळू लागतो. हा व्हिडिओ भावूक करणारा आहे. अनेक लोक या व्हिडिओतील आईची स्तुती करत आहेत.

पहा हा व्हिडिओ:

https://twitter.com/PChaudhry_/status/1638188258499891200

या व्हिडिओला हजारो व्ह्यूज मिळत आहेत आणि या व्ह्यूजची संख्या वाढतच आहे. विशेष म्हणजे हा व्हिडिओ पाहून अनेकांच्या आठवणींना उजाळा मिळाला आहे. आपल्या आईसोबत घालवलेल्या सुंदर क्षणांची आठवण त्यांना होत आहे. तुमच्या आयुष्यातील अशीच एक आठवण कमेंटमध्ये लिहायला विसरु नका.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.