शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. ठाकरे गटाचे नेते आणि विरोधीपक्षनेते अंबादास दानवे माझ्या संपर्कात असून कधीही काही होऊ शकतं असे वक्तव्य संजय शिरसाट यांनी केले आहे.
फोन करून व्यक्त केली नाराजी, संजय शिरसाट यांचा दावा
ठाकरे गटात आलेल्या सुषमा अंधारेंविषयी दानवे यांनी आपल्याला फोन करून नाराजी व्यक्ती केली असल्याचा दावा देखील शिरसाट यांनी केला आहे. त्यामुळे शिरसाट यांच्या दाव्यानंतर राज्याच्या राजकारणात नव्या काय घडामोडी घडतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
शिंदे-फडणवीस सरकारमध्ये ठाकरे गटातील अनेक नेते, पदाधिकारी, आमदार सहभागी होत आहेत. आणखी काही आमदार आमच्या संपर्कात असल्याचा दावा यापूर्वीच शिवसेनेच्या नेत्यांकडून करण्यात आला आहे, मात्र आतापर्यंत कोणत्याही नेत्याचे नाव उघडपणे सांगण्यात येत नव्हते. पहिल्यांदाच संजय शिरसाट यांचे उघडपणे नाव घेऊन, ते आपल्या संपर्कात असल्याचा दावा केला आहे.
काय म्हणाले संजय शिरसाट?
शिवसेनेच्या मेळाव्यात बोलताना संजय शिरसाट म्हणाले की, “अंबादास दानवे यांचा मला फोन आला होता. ते आमच्या संपर्कात आहेत, कधीही काही होऊ शकतं.” तसेच ही नाराजी सुषमा अंधारेंमुळे असल्याचा दावा शिरसाट यांनी केला आहे.
Join Our WhatsApp Community