भंडारा येथील नवेगाव- नागझिरा व्याघ्र प्रकल्पातील कोका वन्यजीव अभयारण्यामध्ये खुर्शिपार तलावाच्या पाणलोट क्षेत्रातील नाल्यात T13 या पट्टेदार वाघाचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत सापडला. तीन दिवसांपासून हा मृतदेह पाण्यात असल्याचा अंदाज वनाधिकाऱ्यांना आहे.
( हेही वाचा : सांगलीत भीषण अपघात; भरधाव कार थेट रसवंतीगृहात घुसली अन्…)
वैद्यकीय पथकाचा अहवाल आल्यावर मृत्यूचे कारण होणार स्पष्ट
गस्तीवर असलेल्या वन कर्मचाऱ्यांना वाघाचा हा मृतदेह सापडला. याची माहिती मिळताच नवेगांव- नागझिराच्या व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालकासह वन विभागाची टीम ताबडतोब त्यांच्या पथकासह घटनास्थळी दाखल झाली. दरम्यान पशू वैद्यकीय अधिकाऱ्यांनी या वाघाचे शवविच्छेदन केले असून मृत्यूचे कारण अद्याप कळू शकले नाही. या वाघाचे सर्व अवयव शाबूत असल्याने वाघाच्या अवयवासाठी शिकारी करण्यात आल्याची शक्यता नाही. वैद्यकीय पथकाचा अहवाल अजून आलेला नाही त्यानंतर वाघाच्या मृत्यूचे कारण स्पष्ट होईल असे सांगण्यात येत आहे.
Join Our WhatsApp Community