मुंबईत पहाटे साकीनाका परिसरात पहाटे ३ वाजता भीषण आग लागली. या आगीत हार्डवेअरचे दुकान जळून खाक झाले आहे. याबाबत माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या चार गाड्या तात्काळ घटनास्थळी झाल्या. मोठ्या प्रयत्नानंतर केवळ अर्ध्या तासात या आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आले परंतु त्यानंतर पहाटे पाचच्या सुमारास ही आग पुन्हा वाढली.
( हेही वाचा : काँग्रेस, राष्ट्रवादीसह आठ पक्षांना मिळणार मंत्रालयाशेजारी नवीन कार्यालये)
आगीचे कारण सध्या अस्पष्ट
पहाटे ३ वाजता लागलेल्या आगीवर नियंत्रणात मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आले होते मात्र ५ वाजल्याच्या सुमारास ही आग एवढी वाढली होती की, परिसरात भितीचे वातावरण पसरले होते. या आगीचे कारण सध्या अस्पष्ट आहे.
पोलिसांनी दिली माहिती
पहाटेच्या सुमारास आग लागली तेव्हा हार्डवेअरच्या दुकानात ८ कामगार झोपले होते. यापैकी ६ जणांना बाहेर काढण्यात अग्निशमन दलाला यश आले परंतु २ जणांना आगीत होरपळून मृत्यू झाला. राकेश गुप्ता (२२) व रमेश देवसिया (२३) अशा दोन व्यक्तींचा आगीत मृत्यू झाला असल्याची माहिती साकीनाका पोलिसांनी दिली आहे. पोलीस या संपूर्ण घटनेचा तपास करत आहेत.
Join Our WhatsApp Community