काँग्रेस नेते राहुल गांधी सातत्याने स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान करत असल्यामुळे भाजपने आक्रमक पवित्रा घेतला असून राज्यासह देशात आंदोलन केले जात आहे. रविवारी झालेल्या मालेगावमध्ये जाहीर सभेत ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी वीर सावरकर आमचं दैवत आहे, त्यांचा अपमान आम्ही सहन करणार नाही असा इशारा दिला होता. तसेच सोमवारी सकाळी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत देखील वीर सावरकरांचा अपमान महाराष्ट्र सहन करणार नाही असे म्हणाले होते. याच पार्श्वभूमीवर बोलत असताना भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे ठाकरेंना सवाल करत म्हणाले की, ‘अपमान सहन होत नाही मग मांडीला मांडी लावून का बसलात?’
ठाकरे गटाचा खोटारडेपणा
माध्यमांसोबत बोलताना चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, तुमच्यात धमक असेल आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांचा खरच तुम्हाला अभिमान असेल तर तुम्ही ज्याप्रमाणे स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान होताना पाहिलेय आणि आता तुम्ही म्हणताय आम्ही सहन करणार नाही. मग त्यांच्या मांडीला मांडी लावून का बसलात. एकीकडे मांडीला मांडी लावून बसायचे त्यांनी केलेला अपमान सहन करायचा. एकीकडे सांगायचे आम्ही हिंदुत्व सोडले नाही आणि दुसरीकडे हिंदुत्वाला संपूर्ण तिलांजली द्यायची. हे आता महाराष्ट्राची जनता सहन करणार नाही. हा खोटारटेपणा आहे आणि हा खोटारडेपणा राज्याची जनता कधीच सहन करणार नाही.
(हेही वाचा – “वीर सावरकरांचा अपमान महाराष्ट्र सहन करणार नाही!” दिल्लीत राहुल गांधींशी चर्चा करणार राऊतांची माहिती)
Join Our WhatsApp Community