शिवसेना प्रवक्त्या शीतल म्हात्रे आणि राष्ट्रवादी काँग्रेस जितेंद्र आव्हाड यांच्यात सध्या ट्वीट वॉर सुरू आहे. मालेगावात झालेल्या उद्धव ठाकरेंच्या सभेतील उर्दू पोस्टरवरून सुरू झालेला हा ट्वीटरवॉर चांगलाच रंगला आहे. याचदरम्यान शीतल म्हात्रेंवर टीका करताना जितेंद्र आव्हाडांची जीभ घसरली आहे.
म्हात्रे आणि आव्हाडांमधील ट्वीटरवॉर
रविवारी मालेगावात झालेल्या उद्धव ठाकरेंच्या सभेनिमित्ताने उर्दू भाषेत लागलेल्या पोस्टरवरून शीतल म्हात्रे यांनी ट्वीट केले होते. हे ट्वीट करत शीतल म्हात्रे यांनी हीच का तुमची हिंदुत्वादी विचारधारा?, असा सवाल ठाकरे गटाला केला होता.
https://twitter.com/sheetalmhatre1/status/1639579304605683712
याच ट्वीटचे प्रत्युत्तर राष्ट्रवादी काँग्रेसचे जितेंद्र आव्हान यांनी देत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा उर्दूमधील पोस्टर ट्वीट केले. आणि ह्याच्यावर बोला ताई, असे आव्हाड म्हणाले होते.
https://twitter.com/Awhadspeaks/status/1639988624891715585
त्यानंतर आव्हाडांच्या ट्वीटला उत्तर देत शीतल म्हात्रे यांनी खोचक टीका केली होती. त्या म्हणाल्या की, मला एक समजत नाही मी बॅनर उद्धवजींचा टाकलाय आणि धूर चक्क राष्ट्रवादीमधून आलाय.
https://twitter.com/sheetalmhatre1/status/1640024225280053248
शीतल म्हात्रेंच्या या ट्वीटला प्रतिसाद देताना जितेंद्र आव्हाडांची जीभ घसरली. ते म्हणाले की, ‘मला काम करताना गवगावा करण्याची सवय नाही. लोकांसाठी कार्येक्रम करतो. माझ्या मतदार संघात येऊन विचारा. उघड्यावर लाज घालवणारे कृत्य मी करत नाही. आठवतेना काय ते ढुं..ण काय तो दांडा…धूर कुठुन निघाला.’
https://twitter.com/Awhadspeaks/status/1640027572590510086
पवारांची भाकरी आणि उद्दवजींची चाकरी…. लगे रहो भाईजान म्हणत शीतल म्हात्रेंनीही आव्हाडांना टोला लगावला.
https://twitter.com/sheetalmhatre1/status/1640039384530690048
म्हात्रेंच्या या ट्वीटवर आव्हाड म्हणाले की, ‘त्याची आपल्याला चिंता नसावी..उगगाच बोलायला लावू नका,…घरचा उपाशी बाहेरचा तूपाशी’
https://twitter.com/Awhadspeaks/status/1640098425914916864
स्त्रियांच्या चारित्र्यावर टिपण्णी करुन शांत करण्याची तुमची पद्धत ही सगळ्यांनाच माहिती आहे आव्हाडजी. बंद दाराआडच्या गोष्टी ही सगळ्यांना माहिती आहे. टिपण्णी करताना आव्हाडजी विसरू नका लेक तुमच्या घरात ही आहे. बाकी निवडणुकीत धूर दाखवू, असे ट्वीट शीतल म्हात्रे यांनी केले.
https://twitter.com/sheetalmhatre1/status/1640228754965540864
(हेही वाचा – अपमान सहन होत नाही मग मांडीला मांडी लावून का बसलात?, वाबनकुळेंचा ठाकरेंना सवाल)
Join Our WhatsApp Community