काँग्रेस खासदार राहुल गांधी यांची सदस्यता रद्द झाल्याच्या मुद्यावरून काँग्रेससह विरोधकांनी संसदेत प्रचंड गोंधळ घातला. त्यामुळे संसदेच्या दोन्ही सभागृहाचे कामकाज स्थगित करावे लागले. सूरत कोर्टाने दोन वर्षांची शिक्षा ठोठावल्यानंतर राहुल गांधींची खासदारकी रद्द झाली. त्यातच सोमवारी संसदेत विरोधकांकडून याच मुद्द्यावर गोंधळ घालण्यात आला. त्यामुळे दोन्ही सभागृहाचे सोमवारचे दिवसाचे कामकाज सुरू होताच काही वेळातच स्थगित करण्यात आले.
विरोधकांच्या गोंधळामुळे लोकसभा चार आणि राज्यसभेचे कामकाज दोन वाजेपर्यंत स्थगित करण्यात आले होते. दरम्यान, या अगोदर काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी मुख्यालयात पक्षाची रणनीती आखली. या बैठकीमध्ये राहुल गांधी यांच्यावरील तत्पूर्वी सोमवारी, काँग्रेस प्रमुख मल्लिकार्जुन खर्गे यांच्या कार्यालयात विरोधी पक्षांची एक प्रमुख रणनीती बैठक झाली. ज्यामध्ये टीएमसीचे प्रतिनिधित्व प्रसून बॅनर्जी आणि जवाहर सरकार यांनी केले. या बैठकीत राहुल गांधी यांना संसदेतून अपात्र ठरवण्याबाबत विरोधकांच्या रणनीतीवर चर्चा झाल्याचे सांगण्यात येत आहे. या सभेत राहुल गांधींच्या अपात्रतेच्या निषेधार्थ काँग्रेस खासदारांनी काळे कपडे परिधान केले होते. के. चंद्रशेखर राव यांच्या नेतृत्वाखालील भारत राष्ट्र समिती, तेलंगणातील काँग्रेसचे प्रतिस्पर्धी, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) देखील काळे कपडे परिधान करून निषेधात सामील झाले असल्याचे सांगण्यात येत आहे.
संसदेच्या अधिवेशनाचा हा तिसरा आठवडा आहे आणि विरोधकांनी अदानी मुद्द्यावर जेपीसीची मागणी केलीय तर सत्ताधाऱ्यांनी राहुल गांधी यांच्या लंडनमधील भाषणाबद्दल माफी मागावी अशी मागणी केली आहे. दरम्यान, अर्थसंकल्पीय अधिवेशन ६ एप्रिलपर्यंत चालणार आहे.
(हेही वाचा – अपमान सहन होत नाही मग मांडीला मांडी लावून का बसलात?, बावनकुळेंचा ठाकरेंना सवाल)
Join Our WhatsApp Community