उद्धव ठाकरेंनी ‘वज्रमुठ’ सभेच्या पोस्टरवरून राहुल गांधींना हटवले

99

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी केलेल्या अवमानकारक वक्तव्यामुळे कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांना चौफेर टीका सहन करावी लागत आहे. भाजपा-शिवसेनेने राहुल यांना लक्ष्य केल्यानंतर महाविकास आघाडीचा घटकपक्ष असलेल्या ठाकरे गटानेही विरोधाचा सुरू आळवला आहे. उद्धव ठाकरेंनी ‘वज्रमुठ’ सभेच्या पोस्टरवरून राहुल गांधींना हटवत थेट इशारा दिला आहे. राहुलऐवजी सोनिया गांधी आणि शरद पवार यांचे फोटो पोस्टरवर लावण्यात आले आहेत.

छत्रपती संभाजीनगरमध्ये २ एप्रिलला महाविकास आघाडीची सभा होणार आहे. या सभेला ‘वज्रमुठ’ असे नाव देत उद्धव ठाकरे गटाच्या वतीने नुकताच सभेचा पहिला टीझर प्रदर्शित करण्यात आला आहे. त्यात बाळासाहेबांचा मोठा फोटो आहे. पोस्टरमध्ये माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, सोनिया गांधी, शरद पवार यांच्यासोबतच विरोधी पक्षनेते अजित पवार आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचा फोटो आहे. मात्र, पोस्टर आणि टीझरमध्येही काँग्रेसचे नेते राहुल गांधींना स्थान देण्यात आले नाही. त्यामुळे सावरकरांच्या मुद्द्यावरून उद्धव सेना आणि कॉंग्रेमध्ये कुरबुरी सुरू झाल्याची चर्चा आहे.

मालेगावमधील सभेतून इशारा

मालेगावमधील सभेत राहुल गांधींच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना उद्धव ठाकरे यांनी चांगलाच समाचार घेतला होता. ‘स्वातंत्र्यवीर सावरकर आमचं दैवत आहे. त्यांचा अपमान पटणारा नाही. लढायचं तर दैवतांचा अपमान सहन करणार नाही’, असा इशारा ठाकरेंनी दिला होता. त्यानंतर आता राहुल गांधींना ‘वज्रमुठ’ सभेच्या पोस्टरवरून हटवल्याने चर्चा सुरू झाली आहे.

(हेही वाचा – ‘आम्ही सारे सावरकर’; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा ‘डीपी’ पाहिलात का?)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.