मुंबईकरांनो, पाणी जपून वापरा; ‘या’ विभागात २९ मार्चपर्यंत पाणी कपात

152

पूर्व द्रुतगती महामार्गावर महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (एमएसआरडीसी) तर्फे पर्जन्य जलवाहिनीसाठी बॉक्स कर्ल्व्हटचे काम सुरु असताना, मुलुंड जकात नाका परिसरात हरिओम नगर येथील बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या २,३४५ मिलीमीटर व्यासाच्या ‘मुंबई – २’ जलवाहिनीस हानी पोहोचून पाणी गळती होत असल्याचे सोमवारी २७ मार्चला निदर्शनास आले. पिसे-पांजरापूर संकुलातून पाणी वाहून आणणाऱ्या या जलवाहिनीच्या गळती दुरुस्तीचे काम तातडीने हाती घेण्यात आले आहे. त्यामुळे सदर दुरुस्ती कालावधीत म्हणजे सोमवार २७ मार्च रोजी रात्री १० वाजेपासून बुधवार २९ मार्च रोजी रात्री १० पर्यंत पूर्व उपनगरे आणि शहर विभागातील बहुतांश परिसरात १५ टक्के पाणी कपात करण्यात येणार आहे.

पूर्व उपनगरे आणि शहर विभागामध्ये पाणी कपात होणाऱ्या परिसरांचा तपशील पुढीलप्रमाणे

१) पूर्व उपनगरे –
टी विभागः मुलुंड (पूर्व) व (पश्चिम) विभाग
एस विभागः भांडूप, नाहूर, कांजूरमार्ग, विक्रोळी येथील पूर्व विभाग.
एन विभागः विक्रोळी, घाटकोपर येथील (पूर्व) व (पश्चिम) विभाग
एल विभागः कुर्ला (पूर्व) विभाग
एम/पूर्व विभागः संपूर्ण विभाग
एम/पश्चिम विभागः संपूर्ण विभाग

२) शहर विभाग –
ए विभागः संपूर्ण विभाग
बी विभागः संपूर्ण विभाग
ई विभागः संपूर्ण विभाग
एफ/दक्षिण विभागः संपूर्ण विभाग
एफ/उत्तर विभागः संपूर्ण विभाग

संबंधित परिसरातील नागरिकांना आवाहन करण्यात येते की, उपरोक्त नमूद कालावधीत पाण्याचा आवश्यक साठा करुन ठेवावा. तसेच, कपातीच्या कालावधीत काटकसरीने पाणी वापरुन सहकार्य करावे, अशी विनंती बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.

(हेही वाचा – धावत्या लोकलमधील थरारक घटना; दिव्यांग प्रवाशाला जाळण्याचा प्रयत्न)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.