“आम्ही सावरकर जगतोय आणि जगलोय… त्यांची वीर सावरकर नव्हे अदानी गौरव यात्रा”, राऊतांचे शिंदे-फडणवीस सरकारवर टीकास्त्र

144

उद्धव ठाकरेंनी मालेगावच्या सभेत स्वातंत्र्यवीर सावरकरांविषयीची भूमिका स्पष्ट केल्यावर सोमवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत घेत ठाकरे गटावर टीकास्त्र सोडले तसेच राज्यभरात सावरकर गौरव यात्रा काढणार अशी घोषणा यावेळी करण्यात आली. यावर आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

( हेही वाचा : महाराष्ट्राला मिळाला नवा किल्ला! कोकणात आहे दुसरा ‘रामगड’, सॅटेलाईट इमेजही काढल्या)

स्वातंत्र्यवीर सावरकर महान क्रांतिकारक होते हे आपण मान्य केले पाहिजे असे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी महाविकास आघाडीच्या सभेत सांगितले अशी माहिती संजय राऊत यांनी दिली. तसेच या प्रकरणी माझी कॉंग्रेसच्या मुख्य नेत्यांसोबत चर्चा झाली आहे असेही त्यांनी सांगितले.

संजय राऊतांची टीका 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सावरकरांचा इतिहास तरी माहिती आहे का? सावरकरांनी देशासाठी केलेल्या त्यागाबद्दल त्यांनी स्वत: उस्फूर्तपणे बोलावे. फक्त दिलेला कागद वाचून दाखवू नये, असं संजय राऊत म्हणाले आहेत. वीर सावरकर गौरव यात्रा काढणे हे राजकीय ढोंग आहे. वीर सावरकरांच्या मुखवट्याखाली हे अदानी गौरव यात्रा काढत आहेत अशी टीका संजय राऊत यांनी शिंदे फडणवीस सरकारवर केली आहे.

हे भाजपला मान्य आहे का?, राऊतांचा सवाल

वीर सावरकर महान देशभक्त, महान समाज सुधारक होते. या ढोग्यांनी आम्हाला वीर सावरकर सांगण्याचा प्रयत्न करू नये कारण आम्ही सावरकर जगतोय आणि जगलोय, शिवाजी पार्क येथे सावरकरांचे स्मारक आहे ते उभारणी बाळासाहेब ठाकरेंचे मोठे योगदान आहे. आमचे हिंदुत्व हे शेंडी-जानव्याचे हिंदुत्व नसून, ते सावरकरांप्रमाणे विज्ञानवादी हिंदुत्व आहे हे भाजपला मान्य आहे का? असा सवाल संजय राऊतांनी केला आहे. मुख्यमंत्र्यांना आता फोन करून सावरकरांबद्दल माहिती आहे का विचारा? असे आव्हान राऊतांनी मुख्यमंत्र्यांना दिले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.