Umesh Pal murder Case: कुख्यात डॉन अतिक अहमदला जन्मठेप

115

तब्बल १७ वर्ष जुन्या उमेश पाल अपहरण प्रकरणी कुख्यात डॉन अतिक अहमद याला उत्तर प्रदेशातील प्रयागराजच्या स्पेशन एमपी-एमएलए न्यायालयाने जन्मठेप आणि पाच हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे. याप्रकरणात अतिकसह सौलत हनिफ आणि दिनेश पासी यांना न्यायालयाने दोषी ठरवले आहे. तर अशरफ सात आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. अहमद आणि अशरफ यांच्यावर २००५ साली राजू पाल यांच्या हत्येचा मुख्य साक्षीदार उमेश पाल यांच्या हत्येचा कट रचल्याचा आरोप आहे.

बसपा आमदार राजू पाल हत्या प्रकरणातील मुख्य साक्षीदार उमेश पाल याच्याशी संबंधित खटल्यात न्यायालयाने मंगळवारी निकाल दिला आहे. या प्रकरणात २८ फेब्रुवारी २००६ रोजी अतिक अहमद आणि अशरफ यांनी उमेश पाल यांचे अपहरण केल्याचा आरोप आहे. उमेश पाल यांना मारहाण केल्यानंतर, कुटुंबासह जीवे मारण्याची धमकी देऊन न्यायालयात बळजबरीने प्रतिज्ञापत्र दाखल करण्यात आले होते. उत्तर प्रदेशात मायावतींचे सरकार स्थापन झाल्यानंतर ५ जुलै २००७ रोजी उमेश पाल यांनी अतिक आणि अशरफ यांच्यासह पाच जणांविरुद्ध एफआयआर दाखल केला होता. मग पोलिस तपासात आणखी सहा जणांची नावे समोर आली.

अतिक आणि अशरफसह ११ जणांविरुद्ध न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यात आले. या खटल्याची सुनावणी २००९ मध्ये सुरू झाली. सरकारी पक्षातर्फे एकूण आठ साक्षीदार हजर करण्यात आले. या प्रकरणातील ११ आरोपींपैकी अन्सार बाबा नावाच्या आरोपीचा मृत्यू झाला आहे. अतीक आणि अशरफसह एकूण १० आरोपींविरोधात न्यायालयाने मंगळवारी निकाल दिला.

(हेही वाचा – धक्कादायक! पुण्यात जन्मदात्या आईनेच केली ४ वर्षांच्या मुलीची हत्या)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.