पुणे-मुंबई या शहरांना हा महत्त्वाचा महामार्ग आहे. त्यामुळे अनेकदा सलग सुट्ट्या आल्या की या मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते. आता मात्र या महामार्गावरून प्रवास करताना सामान्यांच्या खिशाला कात्री लागणार आहे.
१ एप्रिलपासून मुंबई – पुणे प्रवास महागणार आहे. मुंबई – पुणे महामार्गावरील टोलच्या दरात तब्बल १८ टक्क्यांची वाढ करण्यात येणार आहे. २००४ साली सार्वजनिक बांधकाम विभागाकडून मुंबई-पुणे द्रुतगती मार्गाच्या टोलमध्ये दर तीन वर्षांनी १८ टक्के वाढ करण्याची अधिसूचना काढण्यात आली होती.
( हेही वाचा : गुणरत्न सदावर्तेंना मोठा झटका; दोन वर्षांसाठी वकिलीची सनद रद्द)
त्यानुसार, २०२३ मधील टोलच्या दरात वाढ होत आहे. याआधी १ एप्रिल २०२० मध्ये अशीच वाढ झाली होती. मात्र १ एप्रिल २०२३ ला लागू होणारे टोलचे दर हे २०३० पर्यंत कायम असतील, असे एमएसआरडीसी कडून सांगण्यात आले आहे.
वाहन – सध्याचे दर – नवे दर
- चारचाकी – 270 – 320
- टेम्पो – 420 – 495
- ट्रक – 580 – 685
- बस – 797 – 940
- थ्री एक्सेल – 1380 – 1630
- एम एक्सेल – 1835 – 2165