महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या मुख्य अभ्यासक्रमाच्या अंमलबजावणीचा वाद आता उच्च न्यायालयात गेला आहे. MPSC चा नवा अभ्यासक्रम २०२३ पासून लागू करण्याची मागणी सातत्याने करण्यात येत आहे. विद्यार्थ्यांनी केलेल्या आंदोलनानंतर नवा अभ्यासक्रम २०२५ पासून लागू करण्यात आला होता. परंतु याविरोधात आता दोन याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दाखल करण्यात आल्या आहेत. याबाबत पहिली सुनावणी पूर्ण झाली असून न्यायालयाने MPSC ला नोटीस बजावली आहे.
( हेही वाचा : आजारपणाला कंटाळून रुग्णाची आत्महत्या, नायर रुग्णालयाच्या दुसऱ्या मजल्यावरून घेतली उडी)
काही परीक्षार्थींची न्यायालयात धाव
काही महिन्यांपूर्वी राज्यसेवा मुख्य परीक्षेचे स्वरूप बदलून ही परीक्षा वर्णनात्मक पद्धतीने घेण्याचा निर्णय MPSC ने घेतला होता. हा नवा अभ्यासक्रम २०२३ पासून लागू करण्याचे जाहीर केले होते. परंतु विद्यार्थ्यांनी आक्रमक भूमिका घेतल्यावर २०२५ पासून हा नवा अभ्यासक्रम लागू करण्यात आला. अभ्यासक्रमाची अंमलबजावणी २०२५ पासून करण्यात यावी असे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले होते. पण, आता पुन्हा या निर्णयाला सुद्धा विरोध करत काही परीक्षार्थींनी न्यायालयात धाव घेतली आहे.
राज्यात UPSC च्या धर्तीवर MPSC परीक्षेचा अभ्यासक्रम वर्णनात्मक पद्धतीने करण्यात आला होता. परंतु विद्यार्थ्यांनी या विरोधात आंदोलन केले होते. अखेर शिंदे – फडणवीस सरकारने २०२५ पासून अभ्यासक्रम लागू केला जाईल असे जाहीर केले. आता हा विषय पुन्हा एकदा न्यायालयात गेला आहे त्यामुळे न्यायालय काय निर्णय देणार याकडे स्पर्धापरीक्षा देणाऱ्या मुलांचे लक्ष लागले आहे.
Join Our WhatsApp Community