भाजपचे खासदार गिरीश बापट यांच्या निधनाने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अश्रू अनावर झाले. बापट यांच्या निधनाने भाजपचे मोठे नुकसान झाले अशा शब्दांत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली.
काय म्हणाले उपमुख्यमंत्री फडणवीस?
गिरीश बापट हे खाणीतून तयार झालेले अनमोल रत्न होते. १५ वर्षे मॅजेस्टिक आमदार निवासात आम्ही एकत्र राहायचो. माणसे जपण्याची कला त्यांच्याजवळ होती, अगदी चपराशापासून ते मोठ्या माणसापर्यंत त्यांचे संबंध होते. सत्तेत असताना आणि विरोधक असताना ते चपखल शब्दांत सभागृहात बोलायचे तेव्हा समोरच्याला गप्प करायचे. नगरसेवकपदापासून ते मंत्रीपदापर्यंत त्यांनी केलेले काम उत्तम होते. संसदीय कार्यमंत्री असताना मी मुख्यमंत्री म्हणून निश्चिंत असायचो. ते विरोधकांसोबत असलेले संबंध वापरायचे. ते शेतकरी होते त्यांची वडिलोपार्जित अमरावतीची शेती करायचे. ते अष्टपैलू व्यक्तिमत्व होते. सगळ्या क्षेत्राचे त्यांना प्रचंड ज्ञान होते. कृष्णा खोरे प्रकल्पाचे काम त्यांचे कायम स्मरणात राहणार आहे. भाजपचे मोठे नुकसान झाले. असे नेते तयार व्हायला ४० वर्षे लागतात. आम्ही हरणारे बापट साहेब पाहिले नाही, जे आजारी होते पण इतक्या लवकर जातील, असे वाटले नव्हते, असे उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
Join Our WhatsApp Community