भाजपचे खासदार गिरीश बापट यांचे बुधवार, २९ मार्च रोजी यांचे निधन झाले. अजातशत्रू म्हणून ओळख असलेले गिरीश महाजन यांचा निधनाने सर्व पक्षांतील नेत्यांची दुःख व्यक्त केले. त्यांच्या निधनाने राजकारणाची मोठी हानी झाली, अशी प्रतिक्रिया राजकीय नेत्यांनी दिली.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुणे लोकसभा मतदारसंघाचे खासदार गिरीश बापट यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत दुःखद आहे. चार दशकांच्या प्रदीर्घ कारकीर्दीत गिरीश बापट यांनी नेहमीच सर्वसमावेशक भूमिका घेत राजकीय प्रवास केला, अशी प्रतिक्रिया दिली.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते उद्धव ठाकरे यांनी भाजपचे ज्येष्ठ नेते, खासदार गिरीश बापट जी यांना भावपूर्ण श्रद्धांजली. त्यांच्या निधनाने महाराष्ट्राने एक व्यापक जनसंपर्क असलेला नेता आणि उत्कृष्ट संसदपटू गमावला आहे. त्यांच्या आत्म्यास शांती लाभो, ही ईश्वरचरणी प्रार्थना, अशी प्रतिक्रिया दिली.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे म्हणाले, पुणे लोकसभा मतदारसंघाचे खासदार, माजी मंत्री, भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माझे मित्र गिरीश बापट यांचे निधन झालं. राजकीय मतभेद हे व्यक्तिगत मैत्रीच्या आड येऊ द्यायचे नसतात, ही महाराष्ट्राची राजकीय संस्कृती गिरीश बापटांनी कसोशीने पाळली. त्यांच्या निधनाची बातमी अतिशय दुःखद आहे. त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. ओम शांती.
अत्यंत आजारी असतानाही गिरीश बापट आम्हाला भेटायला आले होते, त्यांची ती शेवटची भेट ठरली, त्यांच्याशी माझी घट्ट मैत्री होती, असे काँग्रेसचे नेते उल्हास पवार म्हणाले.
गिरीश बापट हे अतिशय खेळकर आणि मनमिळावू स्वभावाचे होते, त्यांचे सर्व पक्षांमधील नेत्यांशी संबंध होते. त्यांच्या जाण्याने भाजपचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने मी आदरांजली वाहतो, असे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले.
भाजपाचे पुण्यातील खासदार गिरीश बापट यांचं निधन झालं आहे. ते ७२ वर्षांचे होते. प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांच्यावर पुण्यातील रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, त्यांची प्राणज्योत मालवल्याची माहिती समोर आली आहे. त्यांच्यावर संध्याकाळी सात वाजता वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले जाणार आहे, त्यांच्या जाण्याने लोकांशी घट्ट असणा-या नेत्याचा अंत झाला आहे, असे भाजपचे पुणे शहर अध्यक्ष जगदीश मुळीक यांनी दिली आहे.