Ram Navami 2023: राज्यात रामनवमीचा उत्साह; शिर्डीत साईभक्त मोठ्या संख्येने दाखल, फडणवीसांनी घेतले रामाचे दर्शन

134

संपूर्ण देशभरात आज रामनवमीचा उत्सव धुमधडाक्यात साजरा केला जातोय. राज्यातही रामनवमीचा उत्साह पाहायला मिळत आहे. नागपूर, नाशिक, सातारा, शिर्डी, शेगाव, मुंबईसह अनेक ठिकाण राममय झाले आहे. शिर्डीत रामनवमीच्यानिमित्ताने मोठ्या संख्येने साईभक्त पोहोचले आहेत. पहाटेच्या काकड आरतीपासूनच शिर्डीत भाविकांच्या रांगाच रांगा लागल्या असून राज्यभरातून शेकडो पालख्या दाखल्या झाल्या आहेत. तसेच दुसऱ्या बाजूला नागपुरात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरातील राममंदिरात रामाचे दर्शन घेतले.

नागपुरात उपमुख्यमंत्री फडणवीस राममंदिरात रामाचे दर्शन घेतल्यानंतर म्हणाले की, रामनवमीचा उत्सव नागपुरात उत्साहात साजरा होतो. संध्याकाळी शोभायात्रा काढली जाते. सकाळी याठिकाणी रॅली आहे. नागपूरच्या शोभायात्रेचे मोठे महत्त्व आहे. ही ऐतिहासिक शोभायात्रा आहे. गडचिरोली आणि चंद्रपूरच्या जंगलातून राममंदिरासाठी सागवान लाकूड दिले गेले. ही महाराष्ट्रासाठी अभिमानाची बाब आहे.

साई नामाच्या जयघोषात शिर्डी दुमदुमली

रामनवमीच्या निमित्ताने राज्यातलेच नाही, तर राज्याबाहेरील साईभक्त मोठ्या संख्येत शिर्डीत दाखल झाले आहेत. साईंच्या दर्शनासाठी भाविकांच्या लांबच-लांब रांगा लागल्या आहेत. शिर्डीत रामनवमीचा उत्सव तीन दिवस साजरा केला जातो. उत्सवाच्या दुस-या दिवशी काकड आरतीनंतर फोटीची सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. तसेच सुवर्ण रत्नजडित अलंकार साईंबाबा चढवण्यात येतो. तसेच साईंच्या समाधीवर भगवा ध्वज लावण्यात आला आहे.

शिर्डीप्रमाणे बुलढाणा जिल्ह्यातील शेगावमध्ये संत गजानन महाराज मंदिरात राम उत्सवाला सुरुवात झाली आहे. या उत्सवात साडे पाचशे दिंड्यांसह दोन लाख भाविक शेगावात पोहोचले आहेत.

(हेही वाचा – Ram Navami 2023: जाणून घ्या रामनवमीचे महत्त्व)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.