मध्य प्रदेशमधील इंदूरच्या बेलेश्वर महादेव मंदिरात रामनवमीच्या दिवशी मोठा दुर्घटना घडली आहे. विहिरीचे छत कोसळल्याने अनेक भाविक विहिरीत कोसळल्याचे असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे सध्या विहिरीत पडलेल्या भाविकांना बाहेर काढण्याचा प्रयत्न सुरू आहे. माहितीनुसार, आतापर्यंत सात ते आठ जणांना बाहेर काढण्यात यश आले असून त्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
https://twitter.com/ANI_MP_CG_RJ/status/1641344579608903681
इंदूरमधील बेलेश्वर महादेव मंदिरात रामनवमीनिमित्ताने हवन होत होते. यामध्ये सामिल होण्यासाठी मोठ्या प्रमाणात भाविकांनी गर्दी केली होती. सर्व पूजा आणि आरती करत होते यादरम्यान मंदिरात असलेल्या विहिरीवरील १० वर्ष जुने छत कोसळले. या विहिरीवर २० ते २५ भाविक उभे होते. तेव्हाच छत कोसळले. ही विहिर ५० फूट खोल आहे.
या घटनेची माहिती मिळताच जिल्हा प्रशासन घटनास्थळी पोहोचले असून विहिरीत पडलेल्या भाविकांना बाहेर काढण्याचा प्रयत्न सुरू आहे. दरम्यान या विहिरीत पाणी असल्यामुळे बचावकार्यात अडचणी येत आहेत. या घटनेनंतर आता इतर भाविकांना मंदिराजवळ जाण्यास मनाई केली आहे.
दरम्यान मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी या घटनेची दखल घेतली असून त्यांनी इंदूरच्या जिल्हाधिकारी आणि आयुक्तांना फोनवरून बचावकार्य वेगाने करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच मुख्यमंत्री कार्यालय इंदूर जिल्हा प्रशासनाच्या सतत संपर्कात आहे.
(हेही वाचा – छत्रपती संभाजीनगरमध्ये दोन गटात तुफान राडा; पोलिसांच्या वाहनांची जाळपोळ आणि हवेत गोळीबार)
Join Our WhatsApp Community