खैरेंना वेड्यांच्या रुग्णालयात दाखल करा; केंद्रीय मंत्री कराड यांचा घणाघात 

114

संभाजी नगरमधील किराडपुरा भागात दोनच्या सुमारास दोन गटांमध्ये मोठा राडा झाला. येथील राम मंदिराबाहेर हा प्रकार घडला. तसेच जमावाने दगडफेक आणि जाळपोळही केली. दरम्यान, हा राडा पूर्वनियोजित होता असा दावा शिवसेना (उद्धव ठाकरे गट) नेते आणि माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी केला आहे. तसेच याचे खरे मास्टरमाईंड उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच आहेत, असा खळबळजनक आरोपही त्यांनी केला आहे. खैरेंच्या या आरोपाचा केंद्रीय वित्त राज्यमंत्री भागवत कराड यांनी समाचार घेतला.

राम नवमीच्या दिवशी किराडीपुरा येथील प्राचीन मंदिराजवळ जर कोणी असे केले असेल तर त्याच्यावर कारवाई करावी, अशा सूचना मी पोलीस आयुक्तांना दिल्या आहेत. खैरेंचा आरोप खोटा आहे. त्यामुळे त्यांची वैद्यकीय तपासणी करण्याची गरज आहे. तसेच ते जर यामागे देवेंद्र फडणवीसांचा हात असल्याचा आरोप करत असतील तर त्यांना वेड्यांच्या रुग्णालयात दाखल करण्याची गरज आहे, असे केंद्रीय वित्तराज्य मंत्री कराड म्हणाले. महाविकास आघाडीची २ एप्रिल रोजी संभाजीनगरमध्ये सभा होणार आहे, ही सभा होऊ नये म्हणून भाजपाने हा कट रचला असल्याचा आरोप खैरे यांनी केला आहे. यावर भागवत कराड म्हणाले की, महाविकास आघाडीच्या सभेची आम्हाला कल्पना आहे. त्यांचा कार्यक्रम वेगळा आहे. राम नवमीच्या कार्यक्रमाशी त्याला जोडणे चुकीचे आहे. खैरेंचे यासंदर्भातलं वक्तव्य चुकीचे आहे. आम्ही अशा प्रवृत्तीच्या माणसाला खासदार म्हणून निवडून दिले, याचे आम्हाला वाईट वाटते, असेही कराड म्हणाले.

(हेही वाचा रामनवमीच्या दिवशी उद्धव ठाकरे म्हणाले, धनुष्यबाण चोरला असला, तरी…’)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.