रेल्वेगाड्यांवर दगडफेक करणे हा गुन्हा आहे. रेल्वे कायद्याच्या १५३ व्या कलमानुसार दोषींवर कठोर कारवाई केली जाईल. यामध्ये ५ वर्षांपर्यंतच्या शिक्षेची तरतूद आहे. भारतात ‘वंदे भारत’ एक्सप्रेस चालू झाल्यापासून प्रवाशांसाठी प्रवास अतिशय सोपा आणि आरामदायी झाला आहे; पण जसे केंद्र सरकार ‘वंदे भारत’ एक्सप्रेस अधिक मार्गांवर चालू करत आहे, तसे या एक्सप्रेसवर दगडफेकीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे.
याविषयी दक्षिण मध्य रेल्वेने नुकताच इशारा दिला आहे की, ‘वंदे भारत’ एक्सप्रेसवर दगडफेक करणार्यांना ५ वर्षांच्या कारावासाची शिक्षा होऊ शकते. ‘वंदे भारत’ एक्सप्रेसवर दगडफेक केल्याच्या प्रकरणी रेल्वे संरक्षण दलाने आतापर्यंत ३९ गुन्हेगारांना अटक केली आहे. दक्षिण पश्चिम रेल्वेच्या बेंगळुरू विभागात जानेवारी २०२३ मध्ये दगडफेकीची २१ आणि फेब्रुवारी २०२३ मध्ये १३ प्रकरणे नोंदवली गेली आहेत.
(हेही वाचा सर्वोच्च न्यायालयाच्या ‘त्या’ टिपण्णीवर मनसेची भूमिका; हिंदूंना एक आणि मुसलमानांना एक न्याय)
Join Our WhatsApp Community