मध्य रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना दिलासा देणारा एक निर्णय घेतला आहे. उन्हाळ्याच्या सुट्टीनिमित्त पाच उन्हाळी स्पेशल गाड्यांच्या १०० फेऱ्या चालवण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे. यामध्ये पुणे-सावंतवाडीदरम्यान २० फेऱ्या, पनवेल-करमळी १८ फेऱ्या, पनवेल-सावंतवाडी २० फेऱ्या, लोकमान्य टिळक टर्मिनस-कन्याकुमारी १८ फेऱ्या, पुणे जंक्शन-अजनी २२ फेऱ्या होणार आहेत.
याबाबतचा तपशील खालीलप्रमाणे..
१) पुणे – सावंतवाडी रोड स्पेशल (२० फेऱ्या)
०१२११ स्पेशल पुणे येथून दिनांक २.४.२०२३ ते ४.६.२०२३ पर्यंत दर रविवारी २१.३० वाजता सुटेल आणि सावंतवाडी रोड येथे दुसऱ्या दिवशी ०९.३० वाजता पोहोचेल.
०१२१२ स्पेशल दिनांक ५.४.२०२३ ते ७.६.२०२३ पर्यंत दर बुधवारी सावंतवाडी रोड येथून १०.१० वाजता सुटेल आणि त्याच दिवशी २३.५५ वाजता पुणे येथे पोहोचेल.
थांबे: लोणावळा, कल्याण, पनवेल, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, सावर्डा, आरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग आणि कुडाळ.
२) पनवेल – करमळी स्पेशल (१८ फेऱ्या)
०१२१३ स्पेशल पनवेल येथून दिनांक ३.४.२०२३ ते ५.६.२०२३ पर्यंत दर सोमवारी २१.३० वाजता सुटेल आणि करमळी येथे दुसऱ्या दिवशी ०८.३० वाजता पोहोचेल.
०१२१४ विशेष गाडी करमळी येथून दिनांक ४.४.२०२३ ते ६.६.२०२३ पर्यंत दर मंगळवारी ०९.२० वाजता सुटेल आणि पनवेल येथे त्याच दिवशी २०.३० वाजता पोहोचेल.
थांबे: रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिवि.
३) पनवेल-सावंतवाडी रोड स्पेशल (२० फेऱ्या)
०१२१५ विशेष गाडी पनवेल येथून दिनांक ४.४.२०२३ ते ६.६.२०२३ पर्यंत दर मंगळवारी २१.३० वाजता सुटेल आणि सावंतवाडी रोड येथे दुसऱ्या दिवशी ०८.३० वाजता पोहोचेल.
०१२१६ स्पेशल दर सोमवारी सावंतवाडी रोड येथून दिनांक ३.४.२०२३ ते ५.६.२०२३ पर्यंत १०.१० वाजता सुटेल आणि पनवेल येथे त्याच दिवशी २०.३० वाजता पोहोचेल.
थांबे: रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग आणि कुडाळ.
4) लोकमान्य टिळक टर्मिनस – कन्याकुमारी (१८ फेऱ्या)
०१४६३ स्पेशल लोकमान्य टिळक टर्मिनस येथून दिनांक ६.४.२०२३ ते १.६.२०२३ पर्यंत दर गुरुवारी १६.०० वाजता सुटेल आणि कन्याकुमारी येथे दुसऱ्या दिवशी २३.२० वाजता पोहोचेल.
०१४६४ स्पेशल कन्याकुमारी येथून दि. ८.४.२०२३ ते ३.६.२०२४ पर्यंत दर शनिवारी १४.१५ वाजता सुटेल आणि लोकमान्य टिळक टर्मिनस येथे दुसऱ्या दिवशी २१.५० वाजता पोहोचेल.
थांबे: ठाणे, पनवेल, रोहा, चिपळूण, रत्नागिरी, कणकवली, सिंधुदुर्ग, सावंतवाडी रोड, मडगाव जंक्शन, कारवार, उडुपी, मंगळुरू जंक्शन, कासारगोड, कन्नूर, कोझिकोडे, तिरूर, शोरानूर, त्रिशूर, एर्नाकुलम टाउन, कोट्टावलम, कोट्टाला चेंगन्नूर, कायनकुलम, कोल्लम जंक्शन, तिरुवनंतपुरम सेंट्रल, नागरकोइल जंक्शन.
५) पुणे जंक्शन – अजनी स्पेशल (२२ फेऱ्या)
०११८९ स्पेशल पुणे जंक्शन येथून दिनांक ५.४.२०२३ ते १४.६.२०२३ पर्यंत दर बुधवारी १५.१५ वाजता सुटेल आणि अजनी येथे दुसऱ्या दिवशी ०४.५० वाजता पोहोचेल.
०११९० स्पेशल अजनी येथून दि. ६.४.२०२३ ते १५.६.२०२३ पर्यंत दर गुरुवारी १९.५० वाजता सुटेल आणि पुणे जंक्शन येथे दुसऱ्या दिवशी ११.३५ वाजता पोहोचेल.
थांबे: दौंड कॉर्ड लाइन, अहमदनगर, कोपरगाव, मनमाड, भुसावळ, अकोला, बडनेरा, धामणगाव आणि वर्धा.
(हेही वाचा – ‘वंदे भारत’वर दगड फेकणार्यांना होणार ५ वर्षांचा तुरुंगवास)
Join Our WhatsApp Community