मुंबई सुशोभिकरण कामांचा आढावा महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी शुक्रवारी घेतला. या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात ५०० तर दुसऱ्या टप्प्यात ३२० व इतरही अतिरिक्त अशी एकूण १ हजार ०७७ कामे हाती घेतली आहेत. यापैकी ६१३ कामे पूर्ण झाली असल्याचे सांगत ५० टक्के कामे ठरल्याप्रमाणे मार्च अखेर पूर्ण झाली असल्याचा दावा आयुक्तांनी केला आहे. उर्वरित कामे प्रगतिपथावर असून ती कामेही नियोजित वेळापत्रकाप्रमाणे विशेषतः पावसाळा सुरु होण्याआधी पूर्ण करावीत, विद्युत रोषणाईसंबंधी कामे येत्या महिन्यात पूर्ण करावीत, अशी सूचनाही आयुक्तांनी केली.
मुंबई महानगरपालिकेचा विशेष प्रकल्प असलेला मुंबई सुशोभिकरण प्रकल्प यंदाच्या पावसाळ्यापूर्वी करावयाची विविध कामे, तसेच जी २० परिषदेच्या आगामी बैठका या सर्व पार्श्वभूमीवर महानगरपालिका प्रशासनाकडून प्रगतिपथावर असलेली तसेच नियोजित कामे यासंदर्भात महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक इकबाल सिंह चहल यांनी शुक्रवारी, ३१ मार्च २०२३ रोजी आढावा बैठक घेतली, या बैठकीस महापालिका अतिरिक्त आयुक्त (पूर्व उपनगरे) आश्विनी भिडे, अतिरिक्त आयुक्त (शहर) आशिष शर्मा, अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) पी. वेलरासू, अतिरिक्त आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. संजीव कुमार यांच्यासह सर्व संबंधित सहआयुक्त, उपआयुक्त, सहायक आयुक्त तसेच खातेप्रमुख उपस्थित होते.
(हेही वाचा कर्नाटकात मुसलमानांचे आरक्षण रद्द; बोम्मई सरकारच्या शेवटच्या मंत्रिमंडळ बैठकीतील महत्वाचा निर्णय )
महानगरपालिका आयुक्त चहल यांनी सर्वप्रथम नुकत्याच पार पडलेल्या जी20 परिषदेच्या व्यापार व गुंतवणूक सहकार्य गटाच्या बैठकीसाठी महानगरपालिकेने केलेल्या कामांचा संदर्भ देत नमूद केले की, मुंबईत नुकत्याच पार पडलेल्या जी २० परिषदेसाठी महानगरपालिकेने महानगरातील सुशोभिकरण कामांच्या माध्यमातून एक नवा आदर्श देशातील इतर शहरांसमोर ठेवला आहे. डिसेंबर २०२२ मध्ये मुंबईत पार पडलेल्या पहिल्या बैठकीवेळी केलेल्या कामांपेक्षा देखील अधिक उत्कृष्ट कामे यावेळी करण्यात आली. महानगरपालिकेने आपली कामगिरी उंचावत केलेल्या कामांमुळे केंद्र आणि राज्य शासनाने देखील महानगरपालिकेचे कौतुक केले आहे. त्याबद्दल संपूर्ण प्रशासकीय यंत्रणा अभिनंदनास पात्र आहे, असे सांगतानाच फक्त जी २० परिषदेपुरती अशी कामगिरी मर्यादित न राहता, मुंबई सुशोभिकरण प्रकल्पाच्या माध्यमातून या कामांचा अनुभव सर्वसामान्य नागरिकांना कायमस्वरुपी आला पाहिजे, त्याची दक्षता विभागीय पातळीवर घेण्यात यावी, अशी सूचनाही आयुक्तांनी केली.
जी-२० परिषदेच्या सुशोभिकरण कामांमध्ये पुनर्वापरात येवू शकणारे साहित्य योग्यरित्या जपून ठेवावे, जेणेकरुन खर्चाची पुनरावृत्ती टळेल, असे सांगून आयुक्त चहल म्हणाले की, मे २०२३ मध्ये जी20 परिषदेच्या पुढील बैठका होणार आहेत. त्याविषयीच्या नियोजनाला प्रारंभ करावा, म्हणजे पावसाळापूर्व कामे व इतर दैनंदिन कामकाजावेळी धावपळ होणार नाही, असे निर्देशही त्यांनी दिले.
मुंबई सुशोभिकरण प्रकल्पाचा आढावा घेताना आयुक्त चहल म्हणाले की, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील नियमितपणे मुंबई सुशोभिकरण कामांचा आढावा घेत असतात. प्रकल्पात पहिल्या टप्प्यात ५०० तर दुसऱ्या टप्प्यात ३२० व इतरही अतिरिक्त अशी एकूण १ हजार ०७७ कामे हाती घेतली आहेत. पैकी ६१३ कामे पूर्ण झाली आहेत म्हणजे ५० टक्के कामे ठरल्याप्रमाणे मार्च अखेर पूर्ण झाली आहेत. उर्वरित कामे प्रगतिपथावर असून ती देखील नियोजित वेळापत्रकाप्रमाणे विशेषतः पावसाळा सुरु होण्याआधी पूर्ण करावीत, विद्युत रोशणाई संबंधी कामे येत्या महिन्यात पूर्ण करावीत, अशी सूचना आयुक्तांनी केली.
Join Our WhatsApp Community