सरकार आपल्या दारी: १४ एप्रिलपासून मुंबईत मातृशक्ती महिला मेळावे

128

राज्य शासनाच्या महिला व बालकल्याण विभागाच्या माध्यमातून मुंबई शहर व उपनगरांमध्ये सरकार आपल्या दारी – मातृशक्ती महिला मेळावे दिनांक १४ एप्रिलपासून आयोजित होणार आहेत. मेळाव्याच्या माध्यमातून केंद्र आणि राज्य सरकारच्या महिलांसाठीच्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती दिली जाणार असून महिलांच्या सूचना, तक्रारी ऐकून घेण्यात येणार आहेत. या महिला मेळाव्यांच्या समन्वयसाठी प्रत्येक विभाग कार्यालय स्तरावर एका महिला अधिकाऱ्यांची नेमणूक केली जाणार आहे.

मुंबई महानगरपालिकेचा विशेष प्रकल्प असलेला मुंबई सुशोभीकरण प्रकल्प, यंदाच्या पावसाळ्यापूर्वी करावयाची विविध कामे, तसेच जी- २० परिषदेच्या आगामी बैठका या सर्व पार्श्वभूमीवर महानगरपालिका प्रशासनाकडून प्रगतिपथावर असलेली तसेच नियोजित कामे यासंदर्भात महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक इकबाल सिंह चहल यांनी शुक्रवारी ३१ मार्च २०२३ आढावा बैठक घेतली.

(हेही वाचा रस्ते सिमेंट काँक्रिटीकरण कामांच्या पाहणीसाठी मुख्यमंत्री रस्त्यावर उतरणार)

मुंबईत विभागनिहाय होणार मातृशक्ती महिला मेळावे

राज्य शासनाच्या महिला व बालकल्याण विभागाच्या माध्यमातून मुंबई शहर व उपनगरांमध्ये सरकार आपल्या द्वारी – मातृशक्ती महिला मेळावे दिनांक १४ एप्रिलपासून आयोजित होणार आहेत. त्याबाबत राज्याचे महिला व बालकल्याण मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्हा पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी नुकतीच पूर्वतयारी बैठक घेतली. प्रत्येक विभाग स्तरावर होणाऱ्या या महिला मेळाव्याच्या माध्यमातून केंद्र आणि राज्य सरकारच्या महिलांसाठीच्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती दिली जाणार असून महिलांच्या सूचना, तक्रारी ऐकून घेण्यात येतील. यानिमित्ताने महानगरपालिकेच्या वतीने मेळाव्याप्रसंगी येणाऱ्या महिलांसाठी आरोग्य तपासणी शिबीर आयोजित करावे, तसेच महिला मेळाव्यांच्या समन्वयसाठी प्रत्येक विभाग कार्यालय स्तरावर एका महिला अधिकाऱयाची नेमणूक करावी, अशी सूचनाही आयुक्तांनी या बैठकीत केली.

स्वच्छतादूतांची नेमणूक लवकरच

मुंबई महानगरात सार्वजनिक ठिकाणे विशेषतः प्रसाधनगृहांच्या स्वच्छतेला प्राधान्य देण्याची सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वेळोवेळी केली आहे. संपूर्ण मुंबईत मिळून नवीन प्रसाधनगृहांची उभारणी, आवश्यक तेथील प्रसाधनगृहांची दुरुस्ती व देखभाल, नियमित स्वच्छता याबाबतची प्रगती जाणून घेतल्यानंतर आयुक्त चहल म्हणाले की, मुंबईत ५ हजार स्वच्छतादूत नेमण्याच्या दृष्टीने धोरण ठरल्यानंतर आता स्वच्छता दूतांच्या नेमणुकीची प्रक्रिया सुरु झाली आहे, ही समाधानकारक बाब आहे. एप्रिल अखेरपर्यंत सर्व स्वच्छतादूत नेमले जातील, अशा रितीने प्रक्रिया वेगवान पद्धतीने राबवावी, अशा सूचनाही त्यांनी यंत्रणेला दिल्या.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.