ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता असून राऊत यांना मानहानी प्रकरणी नोटीस पाठवण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबाबत आक्षेपार्ह आणि बदनामकारक वक्तव्य केल्याचा आरोप करत ही नोटीस पाठवली गेली आहे. लोकनेते एकनाथ संभाजी शिंदे फाऊंडेशनचे अध्यक्ष अमर विनायक लोखंडे यांनी राऊतांना नोटीस पाठवली आहे.
( हेही वाचा : आर्थिक वर्षाच्या पहिल्या दिवशी सर्वसामान्यांना मोठा दिलासा! LPG सिलिंडरच्या दरात कपात, नवे दर जाणून घ्या… )
संजय राऊत यांच्यावर मानहानीचा दावा दाखल करण्यात आला आहे. त्यांना १०० कोटींची नोटीसही देण्यात आली आहे. एकनाथ शिंदे यांच्याबद्दल वारंवार वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी हा दावा दाखल करण्यात आला आहे. संजय राऊत सोशल मीडियावरून तसेच माध्यमांशी बोलताना सातत्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा अपमान करत होते यामुळे संजय राऊत यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.
तसेच, संजय राऊत यांनी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यामुळे समाज माध्यमांवरही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची बदनामी होत असल्याचा दावा नोटीस पाठवणाऱ्या लोकनेते एकनाथ संभाजी शिंदे फाऊंडेशनचे अध्यक्ष अमर लोखंडे यांनी केला आहे.
Join Our WhatsApp Community