मुंबईतून कोकणात जाणाऱ्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे. मुंबई-गोवा महामार्गावर असणारा सर्वात मोठा कशेडी बोगदा येत्या मे महिन्याच्या अखेरीस वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार आहे. दोन बोगद्यांपैकी एका बोगद्याचे काम ८० टक्के पूर्ण झाले आहे.
कशेडी बोगद्याचे ८० टक्के काम पूर्ण
मुंबई गोवा महामार्गावरील रायगड आणि रत्नागिरीला जोडणाऱ्या कशेडी घाटाला पर्याय म्हणून या बोगद्याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते. नोव्हेंबर २०१८ मध्ये या बोगद्याच्या कामाला सुरूवात झाली होती. कशेडी बोगदा तीन पदरी असून असे दोन बोगदे हाती घेण्यात आले आहेत. त्यातील मुंबईच्या बाजूने जाणाऱ्या एका बोगद्याचे काम ८० टक्के झाले आहे.
चौपदरीकरणाचे काम वेगाने सुरू
दरम्यान मुंबई-गोवा महामार्गावरील चिपळूण तालुक्यातील परशुराम घाटाचे सध्या जवळपास ५ किलोमीटर अंतराच्या घाटातील चौपदरीकरणाचे काम वेगाने सुरू आहे. संपूर्ण घाटाचे काम पावसाळ्यापूर्वी सुरू होऊन हा घाट पूर्ण क्षमतेने आणि सुरक्षितपणे वाहतुकीस खुला व्हावा, यासाठी शासकीय यंत्रणेसह संबंधित ठेकेदार कंपनीने नियोजन केले आहे.
Join Our WhatsApp Community