देशात सर्वात मोठी डेटाची चोरी; तब्बल ६६ कोटी लोकांची माहिती चोरली

123

देशातील सर्वांत मोठी डेटा चोरी झाली. तब्बल ६६.९ कोटी लोकांचा डेटा चोरीला गेला असून यामध्ये कोणाचा पॅन तपशील, कोणाच्या नेटफ्लिक्स खात्याची माहिती, कुणाचा पेटीएम क्रमांक, कुणाचा वैयक्तिक डेटा, अशी पद्धतीने डेटा चोरीला गेला आहे. या प्रकरणात हैदराबाद, तेलंगणाच्या सायबराबाद पोलिसांनी डेटा चोरीप्रकरणी एका व्यक्तीला अटक केली आहे. त्याच्या ताब्यातून जप्त केलेल्या मोबाईल आणि लॅपटॉपची तपासणी केली असता त्यात कोट्यवधी लोकांचा वैयक्तिक डेटा होता. या व्यक्तीला पोलिसांनी ३१ मार्च रोजी सुमारे ७० कोटी लोकांचा आणि कंपन्यांचा डेटा चोरून विकल्याप्रकरणी अटक केली होती.

अटक केलेल्या आरोपींकडून जप्त करण्यात आलेला डेटा २४ राज्ये आणि ८ मेट्रो शहरांमधील लोकांशी संबंधित आहे. दिल्लीपासून गुजरातपर्यंत या सायबर चोराकडे क्रेडिट कार्डपासून ते लोकांच्या मार्कशीटपर्यंतचा डेटा होता. हा सर्व डेटा एका वेबसाईटवर ऑनलाईन विकला जात होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विनय भारद्वाज असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून तो हरियाणातील फरिदाबाद येथील InspireWebz नावाच्या वेबसाइटद्वारे लोकांचा डेटा ऑनलाईन विकत होता. पोलिसांना आरोपींकडून बायजूस आणि वेदांतूसारख्या ऑनलाईन शिक्षण आणि तंत्रज्ञान संस्थांचा डेटा मिळाला आहे. यासोबतच २४ राज्यांचा जीएसटी आणि आरटीओचा डेटाही या व्यक्तीकडून जप्त करण्यात आला आहे.

(हेही वाचा गडाखांना किती खोके घेऊन मंत्री बनवले होते? संजय शिरसाट यांचे उद्धव ठाकरेंना सवाल)

या सर्वात मोठ्या डेटा चोरीच्या राज्यनिहाय आकडेवारीबद्दल बोलायचे झाले तर उत्तर प्रदेशातील २१.३९ कोटी लोकांचा डेटा आरोपींकडून जप्त करण्यात आला आहे. यानंतर मध्य प्रदेशातील ४.५० कोटी, दिल्लीतील २.७० कोटी, आंध्र प्रदेशातील २.१० कोटी, राजस्थानमधील २ कोटी आणि जम्मू-काश्मीरमधील २ कोटी लोकांचा डेटा चोरीला गेला आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.