छत्रपती संभाजीनगरमधील हिंसाचारानंतर राजकीय चिखलफेक सध्या सुरु आहे. सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार आरोप प्रत्यारोप सुरु आहे. मात्र, याचदरम्यान, भाजप राज्यसभेचे खासदार अनिल बोंडे यांनी धक्कादायक विधान केले आहे. छत्रपती संभाजीनगरमधील किराडपुरात झालेल्या हिंसाचाराला राष्ट्रवादी काँग्रेसच्या बड्या नेत्याची फूस होती असा दावा बोंडे यांनी केला आहे.
अनिल बोंडे यांनी एका वृत्तवाहिनीशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर गंभीर आरोप केला आहे. बोंडे म्हणाले, औरंगाबादचे छत्रपती संभाजीनगर असे नामांतर केल्यानंतर शहरात अशांततेचे वातावरण निर्माण करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. या दंगलीतील प्रमुख आरोपी, रियाजुद्दीन आणि मौलाना कादीर यांचे फोन कॉल्स तपासले पाहिजेत. कुठल्या राष्ट्रवादीच्या नेत्याची त्यांना फूस होती हे तपासले पाहिजे असेही अनिल बोंडे म्हणाले. राष्ट्रवादीच्या अब्दूल कादीरला निवडणूक लढवायची आहे. त्याचा मुलगा रियाजुद्धीन नेमका त्याच दिवशी भांडण करतो, त्यानंतर खासदार इम्तियाज जलील यांना मारहाण होते, जलील मंदिरात आसऱ्याला जातात, तिथे तेलाचे डबे असतात, मग तिथे जाळपोळ सुरू होते. हे सर्व राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्याचे (अब्दूल कादीर) आणि त्याचा मुलगा रियाजुद्दीनचे कारस्थान आहे. परंतू, या कारस्थानामागे कोणीतरी मोठ्या नेत्याचा हात आहे, असे बोंडे म्हणाले.
(हेही वाचा ‘मी सावरकर’ : हाती फलक, मस्तकी टोपी; दादर-माहिममध्ये ‘वीर सावरकर गौरव यात्रा’)
Join Our WhatsApp Community