१० वर्षांपासून भाजपने जनतेला एप्रिल फुल केले – धनंजय मुंडे

89

छत्रपती संभाजीनगरमध्ये रविवार, २ मार्च रोजी महाविकास आघाडीची वज्रमूठ सभा होती, तेव्हा राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. औरंगाबादचे नामांत्तर संभाजीनगर करण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारच्या काळात झाला. काल 1 एप्रिल म्हणजेच एप्रिल फूल दिवस झाला. येत्या 6 एप्रिलला भाजपचा स्थापना दिवस आहे. पण, 2014 मध्ये सत्ता आल्यापासून देशातल्या आणि राज्यातल्या जनतेला भाजपने एप्रिल फूल बनवले आहे. मागील 10 वर्षांपासून भाजपकडून जनतेची चेष्टा सुरू आहे. त्यामुळे त्यांचा वर्धापनदिन जनता साजरा करेल, अशी टीका धनंजय मुंडे यांनी केली.

महाविकास आघाडीच्या वज्रमूठ सभेला घाबरुन सरकारमधल्या पक्षांनी एक यात्रा सुरू केली आहे. शिंदे-फडणवीस सरकारच्या विरोधातील मविआची सभा क्रांतीकारी ठरेल. जिथे वज्रमूठ सभा होईल तिथे त्यांची यात्रा येणारच आहे. आम्ही नुसती वज्रमूठ आवळली तरी त्यांच्या पायाखालची वाळू सरकली. इथून पुढे महाविकास आघाडी एकत्रपणे निवडणुका लढणार आहे. ज्या-ज्या वेळी दिल्लीश्वरांनी महाराष्ट्राकडे वाकड्या नजरेनं पाहिलं, त्यावेळी मराठवाड्याच्या लोकांनी त्यांना मातीत गाडलंय, असेही धनंजय मुंडे यावेळी म्हणाले.

(हेही वाचा होय! मी सावरकर; भाजपा-शिवसेनेच्या वतीने राज्यभर ‘सावरकर गौरव यात्रा’)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.