गौरव यात्रेचा उल्लेख केला गेला. जरुर काढा. हिंदू जनआक्रोश नवीन सुरु झालाय. मुंबईत मोर्चा निघाला होता. कुठून काढला माहिती नाही. पण शिवसेना भवनपर्यंत आला होता. याचा अर्थ एकच जगातला सर्वात शक्तिमान हिंदू नेता या देशाचा पंतप्रधान झाल्यानंतर हिंदूंना आक्रोश करावा लागतोय मग नेत्याची काय शक्ती आहे? मविआच्या सरकारमध्ये कोणत्याही समूदायाला आक्रोश करण्याची वेळ आली नव्हती, असा घणाघात उद्धव ठाकरे यांनी केला. छत्रपती संभाजीनगर येथे वज्रमूठ सभेत बोलत होते.
माझ्यावरती आरोप करत आहेत. मी हिंदुत्व सोडलं. या छत्रपती संभाजीनगरच्या मैदानात विचारतो की मी खरंच हिंदुत्व सोडलं तर एक उत्तर द्या. मी घरात जावून बसेन पुन्हा तोंड दाखवू नका. जातीय रंग देत असाल तर हा घटनेचा अवमान आहे. मी म्हणजे आम्ही महाविकास आघाडी. आम्ही काँग्रेससोबत गेलो म्हणून हिंदुत्व सोडतो. मी काँग्रेससोबत गेलो म्हणून हिंदुत्व सोडलं असेल तेव्हा मेहबूबा मुफ्ती बरोबर काश्मीरमध्ये सरकार बनवलं तेव्हा तुम्ही हिंदुत्व सोडलं नाही का?, असेही ठाकरे म्हणाले.
तुमची मस्ती असेल तर ती गाढण्यासाठी वज्रमूठ उभारली आहे. लाखो युवक सुशिक्षित आहेत. अनेकांची परिस्थिती बेताची आहे. कर्ज काढून पदवी मिळवेलेली आहे. अलिकडे डॉक्टरेटही विकत घेता येते. काहीजणं पाणीचं इंजेक्शन घेऊन फिरतो. अनेकजण पदव्या दाखवतात पण किंमत मिळत नाही. तर दुसऱ्या बाजूला पंतप्रधानांना पदवी दाखवा म्हणून मागितलं तर २५ हजारांचा दंड बसतो. आज या व्यासपीठावर जयंत पाटील आणि मी आहे. आम्ही दोघं एकाच शााळेचे आहोत. बालमोहन विद्यामंदिरचे आहोत. त्या शाळेला मंत्री झाल्यानंतर अभिमान वाटला होता. असा अभिमान पंतप्रधान ज्या कॉलेजमध्ये शिकले त्यांना का वाटू नये? पदवी मागितली तर दाखवणार नाही. मग या पदवीचा उपयोग दंड भरण्यासाठी घेता का काय?, असेही ते म्हणाले.
मला एक सांगा, मविआचं सरकार पसंत होतं की नव्हतं? छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांचं नाव घेतो आणि पाठीत वार करायचा? हो आम्ही सत्तेसाठी एकत्र आलो होतो. पण सत्ता गेल्यानंतरही साथ आहोत. असं काही नाही की, मला शिवसेना प्रमुखांची भाषा येत नाही. पण मला आवरावी लागते. मला अमित शाह यांना विचारायचं आहे, आम्ही सत्तेसाठी काँग्रेस, राष्ट्रवादी चाटतो. मग तुम्ही सत्तेसाठी मिंध्यांचं काय चाटताय? चांगली चाललेली सरकार फोडायचं आणि पाडायचं. नितीश कुमार आणि लालू यादव यांचं सरकार पाडून तुम्ही काय चाटत होता?, असा सवाल ठाकरे यांनी केला.
Join Our WhatsApp Community