सावंतवाडी-दादर तुतारी एक्स्प्रेसचा वेग वाढला; प्रवासाचा वेळ वाचणार

190

कोकण रेल्वे मार्गावरील सावंतवाडी ते दादर दरम्यान धावणारी तुतारी एक्स्प्रेस (गाडी क्र. 11004) येत्या ७ एप्रिलपासून काहीशी जलद धावणार आहे. गाडी नेहमीपेक्षा ५० मिनिटे उशिरा सुटून दादरला नेहमीच्या वेळेत पोहोचणार आहे.

तुतारी एक्स्प्रेस सावंतवाडीहून सायंकाळी ७ वाजून १० मिनिटांनी सुटते. येत्या ७ तारखेपासून ती रात्री ८ वाजता सुटणार आहे. गाडी ५० मिनिटे उशिरा सुटूनही ती मुंबईत दादरला नेहमीप्रमाणेच पोहोचणार आहे. वेळापत्रकातील बदलामुळे सावंतवाडी ते वीर दरम्यानच्या स्थानकांवरील वेळेत काहीसा बदल झाला आहे. मात्र वीर स्थानकापासून पुढे दादरच्या दिशेने जाताना ती पूर्वीच्याच वेळापत्रकानुसार लावणार आहे. दादर ते सावंतवाडी या दरम्यान धावणाऱ्या या गाडीच्या (क्र. 11003) वेळापत्रकात मात्र कोणताही बदल झाला नसल्याचे कोकण रेल्वेकडून कळवण्यात आले आहे.

(हेही वाचा ‘मी सावरकर’ : हाती फलक, मस्तकी टोपी; दादर-माहिममध्ये ‘वीर सावरकर गौरव यात्रा’)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.