गिरीश बापट यांच्या जागेवरील पोटनिवडणुकीसाठी भाजपकडून ५ नावांची चर्चा

99

राज्याची सांस्कृतिक राजधानी असलेल्या पुण्याचे खासदार गिरीश बापट यांचे दुखःद निधन झाले. ते महाराष्ट्रातील भाजपच्या जेष्ठ नेत्यांपैकी एक होते. चार दशकांच्या राजकीय कारकीर्दीत त्यांनी अनेक पदे भूषवली. गतवर्षीच्या लोकसभा निवडणुकीत त्यांना पक्षाने उमेदवारी दिली अन् ते पहिल्यांदाच खासदार बनून दिल्लीत गेले. दरम्यान, त्यांच्या निधनाने आता पुणे लोकसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक लागणार आहे. त्यासाठी, भाजपकडून उमेदवारांची चाचपणी सुरू आहे.

गत विधानसभेच्या पोटनिवडणुकीत झालेली चूक लक्षात घेता, यावेळी भाजपकडून सावधानतेनं पाऊलं टाकली जात आहेत. त्यामुळे, या जागेसाठी ५ जणांची नावे सध्या चर्चेत आहेत. त्यामध्ये, पहिलं नाव हे बापट यांच्या कुटुंबातील असून त्यांच्या सुनबाई स्वरदा बापट यांचं आहे. तर, दुसरी पसंती ही माजी खासदार संजय काकडे यांनाही आहे. माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांचंही नाव चर्चेत आहे. त्यासोबतच, पुणे भाजपचे अध्यक्ष जगदीश मुळीक यांचंही नाव पुढे आलं आहे. तर, विधानसभेला तिकीट नाकारेल्या मेधा कुलकर्णी यांचंही नाव येथील उमेदवारीसाठी चर्चेत आहेत. त्यामुळे, या ५ जणांपैकी कोणाच्या नावावर शिक्कामोर्तब होईल, हे पाहावे लागणार आहे.

(हेही वाचा ‘मी सावरकर’ : हाती फलक, मस्तकी टोपी; दादर-माहिममध्ये ‘वीर सावरकर गौरव यात्रा’)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.