केरळमध्ये प्रवाशाने लावली ट्रेनला आग! ३ प्रवाशांचा मृत्यू, ९ जण जखमी

110

रेल्वे प्रवासादरम्यान झालेल्या वादानंतर एका प्रवाशाने ट्रेनला आग लावल्याची घटना केरळच्या कोझिकोडनजीक घडली आहे. यात ३ प्रवाशांचा मृत्यू झाला असून ९ प्रवासी जखमी झाले आहेत. जखमी प्रवाशांना रेल्वे सुरक्षा दलाने (आरफीएफ) रुग्णालयात दाखल केले आहे. ही घटना रविवारी २ एप्रिल रोजी रात्री १० वाजेच्या सुमाराला घडली.

( हेही वाचा : शालेय पोषण आहाराच्या धान्याची अचानक होणार तपासणी )

प्रवाशाने लावली गाडीला आग 

यासंदर्भात आरपीएफ आणि रेल्वे प्रवाशांकडून मिळालेल्या माहितीनुसार अलाप्पुझा-कन्नूर एक्झिटीव्ह एक्सप्रेसमध्ये रविवारी काही प्रवाशांचा वाद झाला. त्यानंतर एका प्रवाशाने गाडीला आग लावली. या घटनेनंतर कोझीकोड शहरानजीक कोरापुझा रेल्वे पुलावर गाडी पोहचली असता प्रवाशांनी साखळी ओढून गाडी थांबवली आणि आरपीएफला घटनेबाबत माहिती दिली.

सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या मदतीने आरोपीचा शोध सुरू 

यादरम्यान गाडीला आग लावणारा आरोपी फरार झाला. तसेच आग लावण्यात आलेल्या बोगीतील एक महिला बेपत्ता असल्याचे लक्षात आले. दरम्यान आरपीएफने रेल्वे ट्रॅकच्या शेजारी शोध घेतला असता सदर महिला, एक बालिका आणि मध्यमवयीन इसमाचा मृतदेह आढळला. या घटनेत इतर ९ रेल्वे प्रवासी जखमी झाले असून आरपीएफने त्यांना रुग्णालयात दाखल केले आहे. दरम्यान आरपीएफ आणि कोझिकोड पोलीस सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या मदतीने आरोपीचा शोध घेत आहेत.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.