भारत आणि अमेरिका करणार संयुक्त युद्धाभ्यास! १० एप्रिलपासून होणार सुरूवात

125

भारत आणि अमेरिकेचे हवाई दल पश्चिम बंगालच्या कलाईकुंडा एअरबेसवर आगामी 10 एप्रिलपासून संयुक्त युद्धाभ्यास करणार आहेत. या संयुक्त सरावाला ‘कोप इंडिया’ असे नाव देण्यात आले आहे.

( हेही वाचा : केरळमध्ये प्रवाशाने लावली ट्रेनला आग! ३ प्रवाशांचा मृत्यू, ९ जण जखमी)

‘कोप इंडिया’ युद्धाभ्यास 

या संयुक्त युद्धसरावासाठी अमेरिकन हवाई दलाच्या एफ-15 लढाऊ विमानांचे एक स्क्वॉड्रन कलाईकुंडा एअरबेसवर पोहोचणार आहे. तर भारतीय वायुसेनेची सुखोई-30 आणि इतर लढाऊ विमाने युद्धाभ्यासात आपली ताकद दाखवतील. सरावामध्ये मेक इन इंडिया मोहिमेअंतर्गत स्वदेशी विमानांची ताकद दाखवण्यासाठी भारताचे लढाऊ विमान तेजस सुद्धा या सरावात सहभागी केले जाणार आहे. कोप इंडिया सराव 2004 मध्ये टेकनपूर, एअर फोर्स स्टेशन, ग्वाल्हेर येथे आयोजित करण्यात आला होता.

भारताची भूमिका महत्त्वाची

या सरावाबद्दल हवाई दलाने म्हटले आहे की, या सरावाचा उद्देश दोन्ही देशांच्या हवाई दलांमध्ये परस्पर सामंजस्य वाढवणे हा आहे. विशेष म्हणजे अमेरिका भारतासोबत संरक्षण संबंध मजबूत करण्याचा प्रयत्न करत आहे. अमेरिकेला भारताला सैन्य उपकरणांची निर्यात वाढवायची आहे. युक्रेन युद्धाच्या बाबतीत भारताची मुत्सद्दीगिरी खूप यशस्वी झाली आहे. एकीकडे रशियाने भारताचे कौतुक करून भारत हा महत्त्वाचा सहयोगी असल्याचे म्हटले आहे. तर अमेरिकेलाही भारताचे महत्त्व कळले आहे. चीनच्या आक्रमकतेला तोंड देण्यासाठी आणि इंडो-पॅसिफिक क्षेत्रात शांतता प्रस्थापित करण्यासाठीही भारताची भूमिका महत्त्वाची आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.