आयपीएलच्या नव्या हंगामाला ३० मार्चपासून सुरूवात झाली आहे. इंडियन प्रीमियर लीगचा पाचवा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि मुंबई इंडियन्स या संघांमध्ये झाला. मुंबईने दिलेल्या १७२ लक्ष्याचा पाठलाग करताना विराट कोहली आणि फाफ डु प्लेसिसने अर्धशतके ठोकली.
( हेही वाचा : पुण्यात कोयता गॅंगची दहशत! अल्पवयीन मुलांकडून तरुणावर वार)
अर्धशतकांचा विक्रम
यावेळी विराट कोहलीने ४९ चेंडूंमध्ये ६ चौकार आणि ५ षटकार ठोकत नाबाद ८२ धावांची खेळी केली. तर फाफने ६ षटकार आणि ५ चौकार मारत ७३ धावांची खेळी साकारली. कोहलीने केलेल्या अर्धशतकामुळे RCB ला मुंबई इंडियन्सवर सहज विजय मिळवता आला. या सामन्यात कोहलीने आपल्या नावे एका नव्या रेकॉर्डची नोंद केली आहे. कोहलीने संपूर्ण IPL मध्ये एकूण ५० अर्धशतके ठोकली आहेत. या यादीत डेव्हिड वॉर्नर अव्वल स्थानी आहे. विराटच्या मागोमाग शिखर धवनने ४९ अर्धशतके केली आहे.
मुंबईचा पराभव
आरसीबीचे सलामीवीर फलंदाज विराट कोहली आणि फाफ डु प्लेसिसने अर्धशतकांच्या जोरावर RCB ला विजयी सलामी दिली. मुंबई इंडियन्सने आरसीबीसमोर १७२ धावांचे आव्हान ठेवले होते. ते आरसीबीने १६.२ षटकात २ विकेट्स गमावत पूर्ण केले यामुळे पहिल्या सामन्यात मुंबईचा पराभव झाला आहे.
Join Our WhatsApp Community