२०१९मध्ये महाविकास आघाडीच्या सरकार स्थापनेवेळी उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदे यांचे नाव मुख्यमंत्री पदासाठी दिले होते. पण शरद पवारांनी उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीपदासाठी गळ घातली, असा मोठा गौप्यस्फोट ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी केला आहे. या गौप्यस्फोटामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ माजली आहे.
नक्की काय म्हणाले अरविंद सावंत?
अरविंद सावंत म्हणाले की, २०१९मध्ये महाविकास आघाडी सरकारच्या स्थापनेवेळी उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेंचेच नाव दिले होते. पण यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार म्हणाले की, काँग्रेसमध्ये पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण असे दोन दोन मुख्यमंत्री आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये छगन भुजबळ, जयंत पाटील, अजित पवार यांच्यासारखे दिग्गज नेते आहेत. ते या रिक्षावाल्याच्या हाताखाली काम करणार का? असा सवाल उपस्थित केला होता. त्यानंतर पवारांनी उद्धव ठाकरे तुम्हीच मुख्यमंत्रीपद सांभाळा असे सांगितले.
अरविंद सावंत यांच्या या धक्कादायक खुलासामुळे राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे. तसेच त्यांच्या या दाव्यावर आता शिंदेंच्या शिवसेनेकडून काय प्रत्युत्तर दिले जाते, हे पाहणे महत्त्वाचे आहे.
(हेही वाचा – लोकसभा निवडणुकीपूर्वी अशोक चव्हाण भाजपमध्ये जातील; संजय शिरसाटांचा मोठा दावा)
Join Our WhatsApp Community