छत्रपती संभाजीनगर येथे नवीन विहीर खोदण्याचे काम सुरु होते, त्यावेळी अचानक विहिरीचा काही भाग ढासळला, त्यावेळी खाली काम कारणारे पाच मजूर ढिगाऱ्यात दबले. छत्रपती संभाजीनगरच्या वैजापूर तालुक्यातील ही घटना आहे. झोलेगावच्या जांबरखेडा फाटा येथे पोलिसांसह बचाव पथक दाखल झाले आहे.
दोघांना सुखरुपपणे बाहेर काढले
मातीच्या ढिगाऱ्यात अडकलेल्या पाच मजुरांपैकी दोन जखमी मजुरांना सुखरूप बाहेर काढण्यात बचाव पथकासह पोलिसांना यश आले आहे. परंतु अजूनही इतर तीन लोक ढिगाऱ्याखाली दबलेले असल्याची माहिती मिळत आहे. रतनसिंग रावत व छोटू भिल अशी जखमींची नावे असून सीताराम रावत, महावीर रावत, बंनजी गुजर अशी ढिगाऱ्यात दाबलेल्या परप्रांतीय मजुरांची नावे आहे. छत्रपती संभाजीनगरच्या वैजापूर तालुक्यातील झोलेगावच्या जांबरखेडा फाट्यानजीक एका शेतात विहिरीचे काम सुरु होते. तिथे परप्रांतिय मजुरांसह स्थानिक लोक देखील काम करत होते. परंतु विहिरीचे काम सुरु असताना दुपारच्या सुमारास अचानक विहीरचा काही भाग ढासळल्याने खाली विहिरीत काम करणारे मजूर मातीच्या ढिगाऱ्याखाली दबले. पाच मजुरांपैकी दोघांना सुखरुपपणे बाहेर काढण्यात आले आहे, तर तीन जणांना बाहेर काढण्यासाठी बचाव पथक प्रयत्नांची शर्थ करत आहे.
(हेही वाचा मोदींच्या पदवीवरून उद्धव ठाकरेंची टीका, अजित पवार म्हणतात विषय महत्वाचा नाही)
Join Our WhatsApp Community