भारताची सर्वात मोठी सार्वजनिक बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाचे (एसबीआय) नेट बँकिंग सर्व्हर सोमवारी डाऊन झाले. त्यामुळे देशभरातील एसबीआयच्या ग्राहकांना ऑनलाईन व्यवहार करण्यात अडचणी आल्यात. त्रस्त ग्राहकांनी सोशल मीडियावर आपल्या तक्रारी ट्विट केल्या आहेत.
यासंदर्भातील माहितीनुसार एसबीआयचा सर्व्हर सोमवारी सकाळी 9:19 पासून डाऊन आहे. दुसरीकडे, 1 एप्रिल रोजी, वार्षिक आर्थिक व्यवहारांमुळे एसबीआय / योनो / युपीआय सेवा सुमारे 3.30 तास बंद होत्या.अनेक ग्राहकांनी सोशल मीडियावर ट्विट करून तक्रार केली आहे. ग्राहकांचे म्हणणे आहे की सर्व्हर डाऊन असल्यामुळे आम्ही कोणताही ऑनलाईन व्यवहार करू शकत नाही. स्टेट बँक ऑफ इंडियाच्या देशभरात 22 हजारांहून अधिक शाखा आहेत. बँकेच्या इंटरनेट बँकिंक ग्राहकांची संख्या 31 डिसेंबर 2020 पर्यंत सुमारे 8.5 कोटी आहे आणि मोबाईल बँक ग्राहकांची संख्या 1.9 कोटी आहे. तर बँकेच्या युपीआय ग्राहकांची संख्या सुमारे 13.5 कोटी आहे.
(हेही वाचा मोदींच्या पदवीवरून उद्धव ठाकरेंची टीका, अजित पवार म्हणतात विषय महत्वाचा नाही)
Join Our WhatsApp Community