दिल्लीच्या नव्या दारू धोरणात भ्रष्टाचार केल्याप्रकरणी जेलमध्ये असलेले आम आदमी पक्षाचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या कोठडीतील मुक्काम पुन्हा वाढला आहे. सिसोदियांच्या न्यायालयीन कोठडीत १४ दिवसांची वाढ करण्यात आली आहे. ‘राऊस एव्हेन्यू’ न्यायालयात सिसोदियांना सोमवारी हजर करण्यात आले होते, त्यावेळी न्यायालयाने १७ एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला.
या सुनावणीच्या वेळी सीबीआयच्यावतीने सरकारी वकिलांनी तपास महत्त्वाच्या टप्प्यात असल्याचे सांगत सिसोदियांच्या कोठडीत वाढ करण्याची मागणी केली. त्यानुसार न्यायालयाने सिसोदियांच्या कोठडीत १४ दिवसांची वाढ केली.
दरम्यान मनीष सिसोदियांनी न्यायालयात हजर करण्याच्यावेळी आप मुख्यालयावर कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. त्यामुळे पोलिसांनी ‘राऊस एव्हेन्यू’ न्यायालय आणि भाजप मुख्यालयासमोर सुरक्षेसाठी पोलीस बॅरिकेड्स लावले.
यापूर्वी गेल्या महिन्यात दिल्लीच्या विशेष सीबीआय न्यायालयाने सिसोदियांची जामीन याचिका फेटाळली होती. तेव्हा आप म्हणाले होते की, कनिष्ठ न्यायालयाच्या निर्णयाविरोधात मनीष सिसोदिया दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेणार आहेत. मनीष सिसोदिया यांना सीबीआयने २६ फेब्रुवारी रोजी दिल्लीच्या नवीन दारू धोरणात भ्रष्टाचार केल्याच्या आरोपाखाली अटक केली होती.
नेमके प्रकरण काय?
गतवर्षी २०२२ साली दिल्ली सरकारने नवीन उत्पादन शुल्क धोरण लागू केले होते. याच धोरणामुळे कोट्यावधींची उलाढाला होईल. शिवाय मद्य माफियांवर अंकुश बसेल, असा विश्वास केजरीवाल सरकारला होता. सर्व सरकारी आणि खासगी दारूची दुकाने बंद करून या धोरणाअंतर्गत नवीन निवादा जारी केल्या होत्या. मात्र या नवीन धोरणामुळे सर्व दुकाने खासगी व्यावसायिकांच्या ताब्यात गेली. त्यामुळे यावर दिल्लीच्या उपराज्यपालांनी आक्षेप घेतला आणि यात गैरव्यवहार केल्याचा आरोप करण्यात आला होता.
(हेही वाचा – ठाकरे गटाचा पुण्यातील नेता भाजपमध्ये प्रवेश करणार; चंद्रशेखर बावनकुळेंचा दावा)
Join Our WhatsApp Community