नायब तहसिलदारांच्या मागण्याबाबत बुधवारी मंत्रालयात बैठक

148

राज्यातील नायब तहसिलदारांनी पुकारलेल्या आंदोलनाची दखल राज्य शासनाने घेतली आहे. राज्यातील नायब तहसिलदारांचे प्रश्न प्राधान्याने सोडविण्यासाठी बुधवारी ५ एप्रिलला मंत्रालयात बैठक घेऊन मार्ग काढणार असल्याची ग्वाही महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सोमवारी दिली. नायब तहसिलदारांच्या विविध मागण्याबाबतचे निवेदन स्वीकारल्यानंतर त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.

महाराष्ट्र राज्य तहसिलदार व नायब तहसिलदार संघटनेच्यावतीने अहमदनगर येथील कार्यक्रमादरम्यान महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना नायब तहसिलदारांच्या विविध मागण्याबाबतचे निवेदन देण्यात आले. यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांशी त्यांनी चर्चा करून मागण्या जाणून घेतल्या. यावेळी उपजिल्हाधिकारी संदीप चव्हाण प्रांताधिकारी, गोविंद शिंदे तहसिलदार, कुंदन हिरे, अमोल निकम आदी उपस्थित होते.

तालुकास्तरावरील नायब तहसिलदार हे अतिशय महत्त्वपूर्ण व जबाबदारीचे राजपत्रित वर्ग २चे पद आहे. त्यामुळे नायब तहसिलदारांच्या मागण्याबाबत शासन लवकरच प्रशासनाशी बैठक घेऊन मार्ग काढणार असल्याची ग्वाही महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली.

(हेही वाचा – केंद्रात आणि राज्यात सत्ता आहे, मग वीर सावरकरांना भारतरत्न देण्यासाठी कुठल्या वेळेची वाट बघताय? – अजित पवार)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.