पत्राचाळ प्रकरणात ईडीने केली ‘ही’ महत्वाची कारवाई

108

गोरेगाव, मुंबई येथील पत्राचाळ प्रकल्पाच्या पुनर्विकासातील अनियमिततेच्या प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने प्रिव्हेंशन ऑफ मनी लाँडरिंग कायदा, 2002 (PMLA) च्या तरतुदींनुसार मेसर्स गुरु आशिष यांच्या एकूण 31.50 कोटी रुपयांच्या 2 स्थावर मालमत्ता तात्पुरत्या जप्त केल्या आहेत. जप्त केलेली स्थावर मालमत्ता राकेश कुमार वाधवान आणि सारंग कुमार वाधवन यांच्या गुरू आशिष कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेडची आहे.

काय होते प्रकरण?

गोरेगावातील पत्राचाळीत म्हाडाचा भूखंड आहे. या प्रकरणी प्रवीण राऊत यांच्या गुरु आशिष कन्स्ट्रक्शन कंपनीला चाळ विकसित करण्याचं काम देण्यात आलेलं. पण त्यांनी संबंधित जागेचा काही भाग हा खासगी विकासकांना विकल्याचा आरोप ईडीचा आहे. नियमानुसार, गुरु आशिष कन्स्ट्रक्शनला पत्रा चाळचे 3 हजार फ्लॅट बांधकाम करायचे होते. त्यापैकी 672 फ्लॅट तिथे राहणाऱ्या भाडेकरुंना, तर उर्वरित फ्लॅट म्हाडा आणि विकासक यांच्यात वाटून घ्यायचे होते. या दरम्यान प्रवीण राऊत यांनी गुरु आशिष कन्स्ट्रक्शन कंपनीचे 258 टक्के शेअर एचडीआयएलला विकले. त्यानंतर 2011, 2012, 2013 मध्ये भूखंडाचे अनेक भाग इतर खासगी विकासकांना हस्तांतरित करण्यात आले, असा आरोप आहे. या प्रकरणी ईडीने प्रवीण राऊत यांना अटक केलेली. त्यानंतर प्रवीण राऊत हे संजय राऊत यांचे निकटवर्तीय असल्याची माहिती समोर आलेली. या प्रकरणी पुढे ईडीने पुढे संजय राऊत यांच्यावर आरोप केलेला. त्यानंतर राऊतांना अटकही करण्याच आलेली. याप्रकरणी ईडीकडून अजूनही कारवाई सुरु आहे.

(हेही वाचा पुणेनंतर आता डोंबिवलीत कोयता गँगची दहशत; घरात घुसून ज्येष्ठ नागरिकांना धमकावले)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.