लंडनमध्ये पुन्हा भारतीय विद्यार्थ्याची हिंदू म्हणून बदनामी; रश्मी सामंतनंतर करण कटारियांची मानसिक छळवणूक

100

लंडन येथील प्रसिद्ध ऑक्सफर्ड विद्यापीठात विद्यार्थी संघटनेच्या अध्यक्षपदी पहिल्यांदा निवड झालेली भारतीय महिला विद्यार्थिनी रश्मी सामंत हिची ती हिंदू आहे म्हणून छळवणूक करण्यात आली होती. त्याला कंटाळून अखेर तिने तिच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. लंडनमधील हिंदुद्वेष यावरच थांबलेला नाही तर आता लंडन स्कूल ऑफ इकोनॉमिक्समध्ये शिकत असलेल्या करण कटारिया यांनाही तो हिंदू आहे म्हणून त्यांचीही छळवणूक करण्यात येत आहे त्यावर आता सोशल मीडियात जोरदार चर्चा सुरु झाली आहे. अखेर करण यांना विद्यार्थी संघटनेच्या निवडणुकीतून बाहेर काढण्यात आले.

काय आहे प्रकरण?

करण हे हरियाणातील एका अशा कुटुंबातून येतात ज्यातील कोणतीही व्यक्ती आजपर्यंत कुणीही पदवीधर झाले नाही. ते जेव्हा उच्च शिक्षणासाठी लंडनमध्ये आले, तेव्हा त्यांनी शैक्षणिक अभ्यासासोबत विद्यार्थांच्या न्याय्य हक्कांसाठीही लढण्याचे ठरवले होते. त्यांच्या स्वप्नांचा चक्काचूर झाला आहे. करण हे हिंदू असल्यामुळे त्यांच्या विरोधात विद्यापीठात विविध मोहीम सुरु करण्यात आले. त्यांना इतर विद्यार्थांचे समर्थन असून सुद्धा LSE मधील स्टूडंट यूनियनच्या जनरल सेक्रेटरीच्या पदासाठी त्यांना या निवडणुकीत अपात्र ठरवण्यात आले होते. त्यांच्यावर होमोफोबिक, इस्लामोफोबिक, क्विरफोबिक असण्याचा आरोप करण्यात आला. तसेच ते हिंदू आहेत, असाही आरोप करण्यात आला. त्यांच्या विरोधात अनेक तक्रारी आल्या तसेच करण यांच्या चारित्र्यावर चिखलफेक देखील करण्यात आली आहे. हे सगळे जरी महाविद्यालयाच्या आवारात होत असले तरी या संबंधी तक्रार करून सुद्धा पदाधिकाऱ्यांकडून कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. या उलट निवडणूकीसाठी भरलेला त्यांचा अर्ज नाकरण्यात आला. करण यांनी हा अन्याय निमूटपणे सहन न करता भक्कम भूमिका घेत त्यांची बाजू मांडली आहे. त्यांना आता सोशल मीडियात जोरदार समर्थन मिळत आहे.

(हेही वाचा मोदींच्या पदवीवरून उद्धव ठाकरेंची टीका, अजित पवार म्हणतात विषय महत्वाचा नाही)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.