मेट्रोत तरुणीचा बिकिनी घालून प्रवास; मेट्रो प्रशासन म्हणते हा सामाजिक गुन्हा

82

दिल्ली मेट्रोत जवळपास ४७.३ लाख यात्री दररोज प्रवास करतात, तिथे सध्या नवा रोग पसरला आहे की काय, असे नेटकऱ्यांना वाटत आहे. स्त्रियांसाठी त्या मानाने असुरक्षित मानले जाणारे दिल्ली शहर सध्या बिकिनीमध्ये प्रवास करणाऱ्या एका तरूणीमुळे पुन्हा चर्चेत आले आहे. कुणाला त्या तरुणीच्या कपड्यात काहीच वावगं वाटत नाही, तर कुणाला तरूणीचे कपडे अश्लील वाटत आहेत.

या सर्व घडामोडीनंतर ट्रेंडी ब्रा आणि मिनी स्कर्ट परिधान करणाऱ्या ‘त्या’ तरुणीने प्रतिक्रिया दिली आहे. आपण गेल्या अनेक महिन्यांपासून दिल्ली मेट्रोतून अशाच प्रकारे प्रवास करत आहोत, असा खुलासा तिने केला आहे. मी काय परिधान करायचं? हे माझं स्वातंत्र्य आहे. हे मी पब्लिसिटी स्टंट किंवा प्रसिद्धी मिळवण्यासाठी करत नाहीये. माझ्या कपड्यांबद्दल लोकांना काय वाटतं? याची मला पर्वा नाही. मी उर्फी जावेदचं अनुकरण करत नाहीये. माझ्या एका मित्राने अलीकडेच मला उर्फीचा फोटो दाखवला. तोपर्यंत उर्फी कोण आहे? हे मला माहीत नव्हतं, असेही त्या तरुणीने म्हटले आहे.

(हेही वाचा आता ATM मधून १०० रुपयांच्या नोटा सहज मिळणार; सरकारने दिले ‘हे’ आदेश)

डीएमआरसीची काय दिली प्रतिक्रिया?

प्रवासा दरम्यान सामाजिक शिष्टाचार आणि नीतीमूल्यांचे पालन प्रवाशांनी करावे अशी आमची अपेक्षा आहे. मेट्रोतून प्रवास करताना कोणी कोणते कपडे घालावेत हा प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न असला तरी आपल्या वर्तनामुळे इतरांना त्रास होत नाही ना याचा विचार करणं अपेक्षित आहे. डीएमआरसी ऑपरेशन आणि मेंटेनन्स कायद्याच्या कलम-५९ अनुसार अश्लिलतेला दंडनीय अपराध म्हणून संबोधण्यात आले आहे. डीएमआरसीने सर्व प्रवाशांना आवाहन केले की, मेट्रोमध्ये प्रवास करताना शिष्टाचारांचे पालन करावे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.