ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पदवीवरून भाजपावर टीका केली. पंतप्रधानांना लहानपणापासून चहा विकून शिक्षण पूर्ण केले मग त्यांनी घेतलेली पदवी लपवण्याचे कारण काय? त्यांची पदवी मागणाऱ्या केजरीवालांना २५ हजार रुपयांचा दंड लावतात हा कुठला न्याय आहे असा सवाल संजय राऊत यांनी केला याला आता राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिउत्तर दिले आहे. मुंबईत सावरकर गौरव यात्रेतून त्यांनी राऊतांवर टीकास्त्र सोडले.
( हेही वाचा : समृद्धी महामार्गावरील अपघात रोखण्यासाठी विशेष उपाययोजना करा, मुख्यमंत्र्यांचे निर्देश!)
देवेंद्र फडणवीसांचा हल्लाबोल
मुंबई येथील चारकोपमध्ये वीर सावरकर गौरव यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. राहुल गांधींनी वीर सावरकरांविरोधात केलेल्या अवमानास्पद वक्तव्याच्या विरोधात शिवसेना आणि भाजपने सावरकर गौरव यात्रा काढून प्रत्युत्तर देण्यास सुरूवात केली. देवेंद्र फडणवीस म्हणाले, “अलिकडच्या काळात बाजारबुणगेही पंतप्रधान मोदींवर बोलतात. त्या बाजारबुगण्यांना सांगू इच्छितो, सूर्याकडे पाहून थुंकाल, तर थुंकी तुमच्या तोंडावर पडणार आहे. सूर्याला काही होणार नाही.”
“हे राऊत, फाऊद, दाऊद यांना मी सांगतो”
पुढे ते म्हणाले, “त्यामुळे हे राऊत, फाऊद, दाऊद यांना मी सांगतो, मोदींकडे तोंड करून थुंकण्याचा प्रयत्न करू नका. तुमची थुंकी तुमच्याच तोंडावर पडत आहे.” असा हल्लाबोल देवेंद्र फडणवीस यांनी संजय राऊतांवर केली आहे.
Join Our WhatsApp Community