इंडिगोच्या विमानात तांत्रिक बिघाड झाल्यामुळे हे विमान, तेलंगणातील हैदराबादच्या शमशाबाद विमानतळावर आपातकालीन परिस्थितीत उतरवण्यात आले. बंगळुरूहून – वाराणसीला जाणाऱ्या या फ्लाईटमध्ये (6ई897) घटनेच्या वेळी 137 प्रवासी होती. सुरक्षित इमर्जन्सी लँडिंग झाल्यामुळे हे सर्व प्रवासी सुखरूप आहेत.
( हेही वाचा : धीरेंद्र शास्त्रींच्या अडचणी वाढल्या! वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी मुंबई पोलिसांत तक्रार दाखल)
वैमानिकांची समयसूचकता
कर्नाटकमधून उत्तरप्रदेशातील वाराणसीला जाणाऱ्या इंडिगोच्या विमानात मंगळवारी अचानक तांत्रिक बिघाड निर्माण झाला. विमानाने बंगळुरूहून उड्डाण केल्यानंतर त्यात तांत्रिक बिघाड असल्याचे वैमानिकांच्या लक्षात आले. त्यानंतर वैमानिकांनी समयसूचकता दाखवत तात्काळ तेलंगणातील शमशाबाद विमानतळाशी संपर्क प्रस्थापित केला. त्यानुसार शमशाबाद विमानतळावरील कर्मचाऱ्यांना सज्ज करण्यात आले.
विमानाचे सुखरूप लँडिंग करण्यात यश
विमानतळावरील सर्व व्यवस्था सज्ज झाल्यानंतर सकाळी 6.15 वाजता विमानाचे सुखरूप लँडिंग करण्यात आले. यापूर्वी 1 एप्रिल रोजी दुबईला जाणाऱ्या फेडेक्स एअरलाईन्सच्या कार्गो विमानाची नवी दिल्ली विमानतळावर इमर्जन्सी लँडिंग करण्यात आली. या विमानाला पक्षी धडकल्यामुळे विमान आपातकालीन परिस्थीत लॅंड करण्यात आले होते.
Join Our WhatsApp Community