कोरोना चाचण्यांची संख्या वाढवा; आरोग्य सचिवांनी दिल्या खबरदारीच्या सूचना

123

कोरोनाचा वाढता प्रभाव रोखण्यासाठी चाचण्यांची संख्या वाढवा, टेस्ट, ट्रॅक, ट्रीट, व्हॅक्सिनेट आणि कोविड अनुरूप वर्तन या पंचसूत्रीचा वापर करा, तसेच प्रीकॉशन डोस देण्यावर भर द्यावा, अशा खबरदारीच्या सूचना सार्वजनिक आरोग्य विभागाचे सचिव नवीन सोना यांनी दिल्या आहेत.

( हेही वाचा : ‘मी सावरकर’ : स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकात ५ एप्रिल रोजी विशेष कार्यक्रम)

राज्यातील वाढत्या कोविड रुग्ण संख्येच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक आरोग्य विभागाचे सचिव नवीन सोना यांनी नुकताच दूरदृश्य प्रणालीद्वारे आढावा घेतला. त्यावेळी त्यांनी या सूचना दिल्या. यावेळी आरोग्य आयुक्त धीरजकुमार, विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, आरोग्य संचालक डॉ. नितीन अंबाडेकर, डॉ स्वप्नील लाळे, सहसंचालक डॉ गौरी राठोड, सहाय्यक संचालक डॉ. बबिता कमलापूर, उपसंचालक, जिल्हा शल्य चिकित्सक, महापालिका आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद आरोग्य अधिकारी उपस्थित होते.

सचिव सोना यांनी सांगितले की, टेस्टिंगचे प्रमाण वाढवावे. त्यामध्ये आरटीपीसीआर चाचणी करण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात. सीटी व्हैल्यू तीस पेक्षा कमी असणारा नमुना जिनोम सिक्वेन्सिंग पाठवला जावा. प्रिव्हेंशन डोसची संख्या वाढवावी. सारी आणि आयएलआय सर्व्हेक्षण जास्तीत जास्त प्रभावीपणे करावे.

राज्यात अद्याप साथरोग कायदा अंमलबजावणी केली आहे. त्यामुळे खासगी दवाखान्यातील तपासणीचे दर पूर्वीचेच दर आहेत, अशी माहिती संचालक डॉ. अंबाडेकर यांनी दिली.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.