एलॉन मस्कने बदलला ट्विटरचा लोगो! आता ब्लू बर्डऐवजी दिसतोय श्वानाचा फोटो

108

एलॉन मस्क यांनी ट्विटरचा पदभार स्वीकारल्यावर ब्लू टिक सब्सक्रिप्शन असो किंवा कर्मचाऱ्यांची कपात ट्विटरमध्ये अनेक बदल करण्यात आले. मंगळवारी पहाटे सुद्धा अनेक युजर्सला आपले ट्विटर अकाऊंट हॅक तर झाले नाही ना? असा प्रश्न पडला पण नंतर स्वत: एलॉन मस्क यांनी एक ट्विट केले आणि युजर्सचा संभ्रम दूर झाला. आता ट्विटरच्या लोगोवर चिमणीऐवजी श्वान झळकणार आहे याची युजर्सला खात्री पटली.

( हेही वाचा : ‘मी सावरकर’ कार्यक्रमाची दोन तिकिटे उद्धव ठाकरेंना पाठवणार – आशिष शेलार )

एलॉन मस्कने मीम शेअर करत दिली माहिती

एलॉन मस्क यांनी एक मीम शेअर करत ही माहिती दिली आहे. या मीमध्ये श्वान कारच्या चालकाच्या जागेवर बसून आपले ओळखपत्र वाहतूक पोलिसांना दाखवत आहे. ओळखपत्रात चिमणीचा लोगो असलेल्या ट्विटरचा फोटो आहे यावर स्पष्टीकरण देताना श्वान म्हणतो “तो माझा जुना फोटो आहे.” हा मीम पाहून ट्विटरच्या लोगोमध्ये बदल झाला असल्याचे निश्चित झाले आणि जेव्हा ट्विटरच्या वेबपेज व होम पेजवरील लोगो बदलला गेला, तेव्हा हा प्रकार अनधिकृत किंवा प्रॅंक नसून विचारपूर्वक केलेला बदल आहे हे सगळ्यांच्या लक्षात आले.

https://twitter.com/elonmusk/status/1642962756906418176?t=isA00E9bGj4tyw61LcnUDg&s=19

मस्क यांचे शिबू इनूवरील प्रेम सगळ्या जगाला प्रचलित आहे. मागे एका वापरकर्त्याने एलॉन यांना सांगितले होते, की तुम्ही ट्विटर विकत घ्या आणि त्याचा लोगो बदला. २६ मार्चला झालेले संभाषण शेअर करत मस्क यांनी वापरकर्त्याती इच्छा पूर्ण केल्याचे दिसत आहे.

https://twitter.com/elonmusk/status/1642976364080041984

तुम्हाला का दिसत नाही हा लोगो?

तुम्ही जर मोबाइलवर ट्विटरचा उपयोग करत असाल तर तुम्हाला हा नवा लोगो एवढ्यात दिसणार नाही. मोबाइलवरच्या वापरकर्त्यांसाठी अद्याप हा अपडेट रोलआउट करण्यात आलेला नाही. जर तुम्ही हा नवीन लोगो पाहाण्यास उत्सुक असाल तर संगणकावरून ट्विटरच्या संकेतस्थळाला भेट देऊन तुम्ही नवा लोगो पाहू शकता.

डॉज इमेज नेमकं आहे तरी काय?

डॉज (Doge) इमेज शिबू इनू, डॉजकॉइन ब्लॉकचेन, क्रिप्टोकरन्सीचे प्रतीक आणि लोगो आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.