ठाण्यात ठाकरे गटाच्या कार्यकर्त्या रोशनी शिंदे यांना शिंदेंच्या शिवसेनेच्या महिला कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याचा प्रकार घडला असून सध्या यामुळे खळबळ उडाली आहे. या मारहाणीत रोशनी शिंदेंना गंभीर दुखापत झाली असून त्या गर्भवती असल्याचा दावा ठाकरे गटाकडून करण्यात आला होता. मात्र त्यानंतर शिवसेनेने रोशनी शिंदे गर्भवती नसल्याचा दावा केला होता. हाच दावा आता खरा ठरला असून रोशनी शिंदे यांच्यावर उपचार करणारे डॉक्टर उमेश आळेगावकर यांनी शिवसेनेच्या दाव्याला दुजोरा दिला आहे.
डॉ. उमेश आळेगावकर म्हणाले की, ‘सोमवारी रात्री साडे दहाच्या दरम्यान माझ्या रुग्णालयात रोशनी शिंदे सिव्हिल रुग्णालयातून दाखल झाल्या. त्यांच्या नातेवाईकांनी माझ्या रुग्णालयात त्यांना दाखल केले होते. त्यांच्या शरीरावर हलक्याशा खुणा होत्या, हे तपासणीत समजले. त्यांना गंभीर मारहाण झालेली नाही. तसेच कुठेही रक्तस्राव झालेला नसल्याचेही स्पष्ट झाले आहे. पाठीवर फक्त मुकामाराच्या खुणा आढळल्या आहेत.’
तसेच पुढे डॉ. उमेश आळेगावकरांनी सांगितले की, ‘सोमवारी रात्री रोशनी शिंदे यांची गर्भधारणा चाचणी नकारात्मक आली आहे. शिवाय मंगळवारी सकाळी पुन्हा गर्भधारणा चाचणी करण्यात आली. तेव्हाही दुसऱ्यांदा चाचणी नकारात्मक आली. हाणामारी झाल्यामुळे पोटाला काही दुखापत झालीये का हे पाहण्यासाठी सोमवारी रात्री सोनोग्राफी करण्यात आली. तिथे देखील कोणतीही अंतर्गत जखम आणि रक्तस्राव आढळून आला नाही. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून जीवितास धोका नाहीये. खबरदारी म्हणून आयसीयूमध्ये २४ तास निगराणीखाली ठेवण्याचा मी निर्णय घेतला आहे.’
(हेही वाचा – रोशनी शिंदे मारहाण प्रकरणात शिवसेनेचा मोठा खुलासा; मारहाण नसून हे ढोंग)
Join Our WhatsApp Community