कुर्ला परिसरातील सात पुलांची पुनर्बांधणी केली जाणार असून या पुलाच्या बांधकामावर सुमारे ५९ कोटी रुपये खर्च केला जाणार आहे. साकीनाका, असल्फा जंगलेश्वर महादेव मंदिर, असल्फा भटवाडी, मिठी नदी, बैल बाजार, अशोक नगर येथील मिठी नदी आणि टिळक नगर रेल्वे स्टेशनजवळील पुलांची पुनर्बांधणी केली जाणार आहे.
महापालिकेच्या कुर्ला एल विभागातील अनेक पादचारी पुलांची अवस्था धोकादायक झाल्याने याचे स्ट्रक्चरल ऑडीट केल्यानंतर या विभागातील सात पादचारी पुलांच्या पुनर्बांधणीचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी महापालिकेच्यावतीने निविदा मागवून कंत्राटदाराची निवड करण्यात आली आहे. या निविदेमध्ये आर.के. मधानी ही कंपनी पात्र ठरली असून यासाठी ६० कोटी रुपयांचा खर्च केला जाणार आहे.
या पुलाच्या बांधकामासाठी टेक्नोजेम कन्सल्टंट प्रायव्हेट लिमिटेड, टीपीएफ इंजिनिअरींग प्रायव्हेट लिमिटेड, श्रीखंडे कन्सल्टंट या तीन सल्लागारांची मदत घेण्यात आली आहे. या तीन कंपन्यांच्या सल्ल्यानुसारच या सात पादचारी पुलांचे बांधकाम हाती घेण्यात येत असल्याचे पुल विभागाच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
या सात पुलांची होणार पुनर्बांधणी
- टिळक नगर, साकीनाका येथील ९० फुट डिसूजा नगर विद्यमान पुलाची पुनर्बांधणी,
- असल्फा-जंगलेश्वर महादेव मंदिर जोडरस्ता येथील विद्यमान चांदिवली पुलाची पुनर्बांधणी.
- असल्फा भटवाडी रोड येथील विद्यमान संत तुकाराम पुलाची संदीकरण व पुनर्बांधणी.
- कुर्ला रांका हाऊस जवळील काळे मार्ग बैल बाजार रोड येथील विद्यमान पुलाची पुनर्बांधणी..
- कुर्ला विभागातील मिठी नदीवरील विद्यमान लाठीया रबर पुलाच्या पूर्वेस रस्ता बांधणेबाबत.
- कुर्ला विभागातील अशोक नगर येथील मिठी नदीवरील विद्यमान पुलाची पुनर्बांधणी.
- कुर्ला विभागातील साई बाबा मंदिर समोरील टिळक नगर रेल्वे स्टेशन व शेल कॉलनी रोड यांना जोडणाऱ्या विद्यमान पादचारी पूलाची पुनर्बांधणी
(हेही वाचा – आश्रय योजना: गोरेगावमधील सफाई कामगारांच्या वसाहतीच्या पुनर्विकासाचा खर्च ९० कोटींनी वाढला)
Join Our WhatsApp Community