४०० पेक्षा अधिक मजुरांनी मिळून तयार केले आहे कोटाचे ‘हे’ भव्य ऑक्सिजन पार्क

97

गेल्या ८ ते १० वर्षांपासून अत्याधुनिकतेची एक लाट आलेली आहे आणि या काळात भारतातही प्रचंड प्रगती झाली आहे. मोठमोठे प्रकल्प उभे राहून त्यांचे कामही पूर्ण झाले आहेत. उदाहरण म्हणून पाहायचे तर मुंबईतील भव्य असा मेट्रो प्रकल्प.

आता कोटा या शहरात प्रचंड मोठे ऑक्सिजन पार बनवण्यात आले आहे. या पार्कसाठी १०० कोई रुपये खर्च करण्यात आले आहेत. गेली २ वर्षे ४०० पेक्षा अधिक मजूर या पार्कच्या निर्माणाचे काम करत होते. ऑइल फॅक्टरीच्या निवारी कॉलनीत या पार्कचे निर्माण करण्यात आले आहे.

(हेही वाचा पुनर्विकासामुळे स्थलांतरित बीडीडी चाळीतील रहिवाशांची संक्रमण शिबिरात होते पाण्यासाठी फरफट)

विशेष म्हणजे या पार्कमध्ये ५ किलोमीटर लांब वॉकिंग ट्रॅक बनवण्यात आले आहे. हे पार्क म्हणजे अनेक वृक्ष, रोपे आणि फुलझाडांनी बहरलेले आहे. हे पार्क आता जवळजवळ तयार झाले असून एप्रिलमध्ये नागरिकांसाठी खुले करण्यात येणार आहे आणि केवळ १०० रुपयांचे तिकीट घेऊन कुणीही या पार्कमध्ये येऊन एक वेगळा अनुभव घेऊ शकतो. या पार्कची खासियत म्हणजे ४ किलोमीटर पर्यंत तापमान कमी राहू शकतं आणि ८ किलोमीटरपर्यंत याच्या ऑक्सिजनच प्रभाव टिकून राहू शकतो. म्हणूनच यास ऑक्सिजन पार्क म्हटले गेले आहे. विशेष म्हणजे लंडनच्या जेम्स पार्कपेक्षाही हे पार्क मोठे आहे. या पार्कच्या मध्यभागी १२०० मीटस एवढे कालवे तयार करण्यात आले आहे, जेणेकरुन लोक बोटिंगची मजा लुटू शकतील.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.