वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर बाईकर्स धुमाकूळ; शर्यती लावणाऱ्या ८२ बाईकर्सवर गुन्हे दाखल

85

वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर जीवघेणे स्टंट आणि शर्यती लावणाऱ्या बाईकर्सवर मुंबई पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. सोमवारी मध्यरात्री परिमंडळ ८ च्या विशेष पथकाने वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर जीवघेण्या शर्यती लावणाऱ्या ८२ बाईकर्सला ताब्यात घेऊन ४२ बाईक्स जप्त केल्या आहेत. ताब्यात घेण्यात आलेल्या बाईकर्सवर खेरवाडी पोलीस ठाण्यात मोटर वाहन कायदा आणि जुगार कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर वांद्रे ते सांताक्रूझ दरम्यान रात्रीच्या सुमारास शेकडो बाईकर्स धुमाकूळ घालून जीवघेणे स्टंट आणि शर्यती लावून त्याच्यावर जुगार खेळला जात असल्याची माहिती परिमंडळ ८चे पोलीस उपायुक्त दीक्षितकुमार गेडाम यांना मिळाली. या माहितीच्या आधारे पोलीस उपायुक्त गेडाम यांनी विशेष पथक तयार करून सोमवारी मध्यरात्री वेस्टर्न एक्स्प्रेस हायवे वांद्रे ते सांताक्रूझ परिसरात साध्या वेशात तैनात करून या बाईकर्स टोळ्यांची चारही बाजूने नाकाबंदी करण्यात आली होती.

(हेही वाचा माहीमच्या समुद्रात पुन्हा मुसलमानांची ये-जा सुरु)

दरम्यान या बाईकर्स टोळ्या वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर येताच त्यांची धरपकड करून ८२ बाईकर्सला ४८ बाईक्ससोबत काढण्यात ताब्यात घेऊन त्यांना खेरवाडी पोलीस ठाण्यात आणून त्यांच्यावर भादवि कलम २७९, ३३६, ११४, ३४ सह १२५, १७७, १२९, १७७, १७९, १८४, १९२ (२), मोटार वाहन कायदा सह, ४ (अ), ५ जुगार प्रतिबंधक काय दयान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असुन गुन्हयाचा पुढील तपास खेरवाडी पोलीस ठाणे करत आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.