ज्या देशाने उदार अंत:करणाने सर्वधर्म स्वीकारण्याचे धोरण अवलंबले त्या देशात ईद, गुड फ्रायडेच्या दिवशी सुट्टी असते मात्र रामनवमीच्या दिवशी सर्वांना सक्तीची सुट्टी नसते. ईद वा गुड फ्रायडेच्या दिवशी मुस्लिम वा ख्रिश्चन जमावावर दगडफेक झाल्याच्या दुर्दैवी घटनांबद्दल तु्म्ही कधी ऐकले आहे का? ऐकले नसेल कारण हिंदू समाजाने कधीही दुसऱ्या धर्मियांवर आक्रमक केले नाही. मागच्या आठवड्यात भारतात मोठ्या प्रमाणात रामनवमीचा उत्सव साजरा करण्यात आला. या उत्सवाला गालबोट लागले, देशभरात तब्बल ७ राज्यांत १२ जातीय दंगली झाल्या.
रामनवमीच्या दिवशी कोणत्या राज्यात उडाला भडका?
महाराष्ट्र
संभाजी नगर – दोन व्यक्तींमध्ये झालेल्या भांडणाने उग्र रूप धारण केले. दंगलीत बॉम्बचा वापर करण्यात आला. ४०० – ५०० अज्ञात इसमांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आले आहे.
जळगाव – झालेल्या हिंसाचारात ४ लोक जखमी झाले आहेत तर ५० – ५५ लोकांना अटक करण्यात आली आहे.
मालाड – मालाडमधून निघालेल्या शोभायात्रेवर चप्पल आणि दगडांचा मारा करण्यात आला. हिंसे दरम्यान अल्लाह-हु-अकबरच्या घोषणा देण्यात आला. ४०० लोकांवर आरोप दाखल करण्यात आला आहे.
(हेही वाचा पुनर्विकासामुळे स्थलांतरित बीडीडी चाळीतील रहिवाशांची संक्रमण शिबिरात होते पाण्यासाठी फरफट)
पश्चिम बंगाल
हावडा – हावड्यात झालेल्या हिंसेसाठी ममता बॅनर्जी यांनी भाजपला जबाबदार धरले आहे. आतापर्यंत पोलिसांनी ३६ जणांना अटक करण्यात आली आहे. हावड्यात सांप्रदायिक हिंसा झाली. यात १२ लोकांना अटक करण्यात आली तर कलम १४४ लागू करुन काही वेळासाठी इंटरनेट सेवा बंद केली होती.
डालखोला – डालखोल्यात झालेल्या हिंसेत एका युवकाचा मृत्यू झाला तर ५ – ६ पोलिस कर्मचारी जखमी झाले.
झारखंड
साहिबगंज – झारखंडच्या साहिबगंजमधील कृष्णानगरच्या कुलीपाडा भागात श्रद्धाळूंवर दगडफेक करण्यात आली. यातून पेटलेल्या हिंसेत एका बाईकला आग लावण्यात आली.
(हेही वाचा भाजपा-शिवसेनेला शह देण्यासाठी उद्धव सेनेकडून ‘घर घर सावरकर’ मोहीम)
गुजरात
वडोदरा – गुजरातच्या वडोदरात इतर राज्यांप्रमाणे शोभायात्रेवर जमावाने दगडफेक केली. जवळपास ५०० लोकांवर केस दाखल करण्यात आली. एकूण २३ लोकांना अटक करण्यात आलेली असून यात ६ महिलांचा समावेश आहे.
कर्नाटक
हासन – ३० मार्चला म्हणजेच गुरूवारी रामनवमीच्या दिवशी निघालेल्या मिरवणुकीवर कट्टरपंथियांनी हल्ला केला होता. मशिदीच्या समोरून निघालेल्या या मिरवणुकीला विरोध करण्यासाठी तेथील जमावावर हल्ला करण्यात आला. हल्ल्यात चाकूचा वापर करण्यात आला होता ज्यामुळे २ इसम जखमी झाले आहेत.
बिहार
नालंदा – इथे शोभायात्रेवर आजुबाजूच्या घरातूंन आणि दुकानांतून दगडफेक करण्यात आली. झालेल्या हिंसेत गोळीबार करण्यात आला, ज्यात ४ जण जखमी झाले आहेत.
रोहतास – रोहतासमध्ये हिंसा इतकी चिघळली होती की, परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी कलम १४४ लागू करण्यात आले.
उत्तर प्रदेश
लखनऊ – लखनऊमध्ये सुद्धा शोभायात्रेवर दगडफेक करण्यात आली. पोलिस फोर्स तातडीने आल्यामुळे या घटनेत कुणाचाही मृत्यू झाला नाही.
(हेही वाचा “हे राऊत, फाऊद, दाऊद यांना…” पंतप्रधानांचा अवमान केल्याप्रकरणी फडणवीसांचे राऊतांवर टीकास्त्र!)
Join Our WhatsApp Community